Amazon Ad

धक्कादायक; नेते प्रचारात, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आवळला मृत्यूचा फास! पाच महिन्यात एकूण ७९ शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा ! जिल्ह्यात विदारक स्थिती..

 

बुलडाणा(अभिषेक वरपे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. जानेवारी ते २५ मे २०२४ या कालावधीत जिल्ह्यातील तब्बल ७९ शेतकऱ्यांनी विविध कारणांमुळे आपली जीवन यात्रा संपवल्याचे विदारक चित्र आहे. 

सततची नापिकी, अवकाळीचा फटका आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यावर्षीच्या सुरुवातीपासूनच लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती. नेते मंडळी प्रचारात व्यस्त होते, तर एकीकडे शेतकऱ्याला कोणी वाली नाही असे शेतकरी सांगतात. अवकाळीचा तडाख्याने जिल्ह्यातील बहुतांश भागातील पीक उत्पादन घटले. त्याआधी लागवडी साठी केलेली पैशांची जमवाजमवी. यामुळे कर्जाचा बोजा वाढला होता. आत्महत्याग्रस्त बहुतांश शेतकऱ्यांनी कर्जापाई आत्महत्या केल्याचे समजते.
पाच महिन्यात ७९ शेतकऱ्यांनी लावला मृत्यूचा फास! 
यावर्षी आतापर्यंत एकूण ७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात १७, फेब्रुवारीमध्ये १९, मार्चमध्ये सर्वाधिक २४, एप्रिल १७ तर २५ मी पर्यंत २ असे एकूण ७९ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.