जालिंदर बुधवतांच्या नेतृत्वात शिवसेनेने मारले किरीट सोमय्याच्या फोटोला जोडे; बुधवंत म्हणाले, सोमय्यांनी जे पेरले तेच उगवले

 
Budhvat
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यभरात अनेकांवर भ्रष्टाचारांचे खोटे आरोप लावणारा आणि त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारा किरीट सोमयाचे खऱ्या अर्थाने वस्त्रहरण झाले आहे. राज्याची प्रतिमा यामुळे मलीन झाली आहे. केंद्राची सुरक्षा यंत्रणा घेऊन राज्यभर फिरणारा हा सोमय्या याचे नेमके कोणते धंदे असे चालतात याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी दिला आहे.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथीत अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याचे पडसाद थेट विधिमंडळात उमटले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातही शिवसेनेने जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. संगम चौकामध्ये आज १८ जुलै रोजी सायंकाळी साडेचार सुमारास भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारले. मुर्दाबाद मुर्दाबाद किरीट सोमय्या मुर्दाबाद चे नारे यावेळी देण्यात आले.
यावेळी जालिंदर बुधवत म्हणाले की, सोमय्याने जे पेरले तेच उगवलं. जो व्हिडिओ समोर आला आहे तो आपण दाखवू शकत नाही. मात्र याचा निषेध केला पाहिजे. सोमय्या सारखी जी प्रवृत्ती आहे, ती वेळीच ठेचली गेली पाहिजे. खऱ्या अर्थाने आज त्याचे वस्त्रहरण झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन तात्काळ सोमय्यावर कारवाई झाली पाहिजे. भाजपची ही संस्कृती आहे का ? एका बाजूला संस्कृती रक्षक म्हणून भाजप टेंभा मिरवते तर दुसरीकडे केंद्र सरकारची सुरक्षा घेऊन भाजप नेते किरीट सोमय्यासारखे असे चाळे करताना समोर आले आहेत. याच सुरक्षा यंत्रणेचा वापर महिलांचे शोषण करण्यासाठी तर होत नाही ना, असा सवाल आज राज्यातील प्रत्येकाला पडला आहे. त्यामुळे किरीट सोमय्याच्या या व्हिडिओ प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि तात्काळ त्याच्यावर कारवाई करावी अन्यथा शिवसेना रस्त्यावरचे आंदोलन तीव्र करेल असा इशाराही जालिंदर बुधवत यांनी दिला आहे.
      यावेळी मुंबई येथील युवासेना कार्यकारिणी सदस्य रुपेश कदम, युवा सेना विभागीय सचिव सागर देशमुख, युवा सेना विस्तारक भरत सांबरे, युवासेना जिल्हा प्रमुख नंदू कऱ्हाडे, शुभम पाटील, तालुका प्रमुख लखन गाडेकर, शहर प्रमुख हेमंत खेडेकर, युवासेना उप जिल्हा प्रमुख डॉ अरुण पोफळे, प्रकाश डोंगरे, शहर प्रमुख सचिन परांडे, उप तालुका प्रमुख विजय इतवारे, हरीदास कड, सुधाकर आघाव, अशोक गव्हाणे, दिपक पिंपळे, अमोल जुंबड, रुपेश लडके, विजय डुकरे, संदीप शिरसाठ, मोहन निमरोट, साहेबराव इतवारे, संतोष बोरकर, भालचंद्र नरोटे, रितेश इतवारे, सोनू राजपूत, सागर शिरसाठ, भगवान काकफळे, शिवराज पाटील, सचिन इतवारे, सागर इतवारे, रमेश सुरडकर, दत्ता शिरसाठ, पप्पू शिरसाठ, भागवत सुरडकर, सुमंत्ता पाटील, शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.