उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने चिखलीत किरीट सोमय्यांच्या फोटोला जोडे मारले ​​​​​​​

 
shivsena
चिखली(गणेश धुंदाळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): माजी खासदार तथा भाजपचे फायरब्रँड नेते किरीट सोमय्या यांचा कथित अश्लील व्हिडिओ एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षांकडून यावर आता भाजपला धारेवर धरल्या जात आहे. विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक पेनड्राईवच उपसभापतींकडे सुपूर्द केला असून त्यात किरीट सोमय्या यांच्या ८ तासांच्या क्लीप असल्याचा दावा केला गेलाय.दरम्यान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने किरीट सोमय्या यांचा निषेध करण्यात आला.
 

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकरांच्या नेतृत्वाखाली किरीट सोमय्या यांच्या फोटोला जोडे मारे आंदोलन करण्यात आले. यावेळी कपिल खेडेकर, विश्वास खंडागळे, प्रीतम गैची, श्याम शिंगणे, प्रलय खरात, हरी इंगळे, गजानन पवार, अशोक सुरडकर, रवी पेटकर, बंडू नेमाने, सतनाम वधवा, शंभू गाडेकर, आकाश डोणगावकर, संतोष देशमुख यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते.