गावागावांत भगवे वादळ तयार कराशिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांचे आवाहन! सिंदखेड राजात शाखाप्रमुख, बुथप्रमुखांची आढावा बैठक!

 
ध्च
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागावे. गावागावांत भगवे वादळ तयार करावे. 'गाव तिथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक' हे अभियान जिल्हाभरात राबवावे, असे आवाहन उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांनी केले.
Dhanik
                           जाहिरात 👆
उद्धव ठाकरे शिवसेना गटाची सिंदखेड राजा तालुका पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक शिवसेना संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली शेंदुर्जन येथे पार पडली. यावेळी जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, विधानसभा संपर्कप्रमुख अनुपकुमार गावड यांची प्रमुख उपस्थिती होती.
आगामी काळातील पक्षाची रणनीती, पक्ष संघटन मजबूत करणे, नवीन मतदारांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करणे यासह अनेक विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी पक्ष सोडून गेलेल्यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी येणाऱ्या लोकसभेसाठी धनशक्तीविरुद्ध जनशक्ती सामना होणार आहे. त्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी तयार असण्याची गरज आहे. याशिवाय आपली लढाई ही सर्वसामान्य शिवसैनिकांच्या भरवशावर आहे. सर्वसामान्य शिवसैनिकच इतिहास घडवत असतो, असेही ते म्हणाले. यावेळी महिला आघाडी जिल्हा संघटका जिजाताई राठोड, युवासेना जिल्हाप्रमुख नंदु कऱ्हाडे, जिल्हा संघटक डॉ. गोपाल बच्छिरे, उपजिल्हाप्रमुखप्रा. आशिष रहाटे, बद्री बोडखे, तालुकाप्रमुख महेंद्र पाटील, दादाराव खार्डे, लखन गाडेकर, युवासेना तालुकाप्रमुख प्रा. सिद्धेश्वर आंधळे, विधानसभा संघटक म्हसाजी वाघ, उपतालुकाप्रमुख रणजित मरमट, शहरप्रमुख उल्हास भुसारे, दिलीप चौधरी यांच्यासह नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते.