शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे ना.प्रतापराव जाधवांना भेटले; भोनगावसाठी केली "स्पेशल" मागणी; अन्यथा १३ ऑगस्ट पासून आमरण...

 
संग्रामपूर(स्वप्निल देशमुख:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगाव तालुक्यातील भोनगाववाशियांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधवांची भेट घेतली. यावेळी भोनगाव येथील वार्ड क्रमांक ३ चा जिगाव प्रकल्पात समावेश करावा अशी मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांना देखील या मागणीचे निवेदन देण्यात आले.
शेगाव तालुक्यातील भोनगाव हे जिगाव प्रकल्पा अंतर्गत बुडीत व बाधित क्षेत्रामध्ये येत आहे. संपूर्ण गाव बुडीत आणि बाधित क्षेत्रांमध्ये येत असल्याने संपूर्ण वार्ड क्रमांक ४ चा जिगाव प्रकल्पाच्या यादीमध्ये समाविष्ट करून घ्यावा असे निवेदन शिवसेना जिल्हा उपप्रमुख संजय अवताडे व युवासेना शेगाव तालुका प्रमुख उमेश पाटील शेळके व प्रकाश भारसाकडे, गणेश बिचारे, रमेश, मोरखडे विलास मेसरे व इतर गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या मागणी संदर्भात गावकऱ्यांनी केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांचीही भेट घेतली. निवेदनातील मागण्या पूर्ण न झाल्यास १३ऑगस्ट२०२४ पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.