शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंची तोफ आज जिल्ह्यात धडाडणार! सिंदखेडराजा, मेहकरात जाहीर सभांना संबोधित करणार...

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज जिल्ह्यात येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा आणि मेहकर येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. दोन्ही सभांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर आणि जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी केले आहे.
Add
                         Add. 👆
बुलडाणा लोकसभा मतदारसंघाकरीता २६ एप्रिलला मतदान होणार आहे. महाविकास आघाडीत ही जागा उबाठा शिवसेनेलाच जाण्याची अधिक शक्यता आहे. याआधी २२ एप्रिलला देखील उध्दव ठाकरेंचा बुलडाणा जिल्हा दौरा झाला होता, त्यावेळी चिखली, मोताळा आणि जळगाव जामोद मध्ये त्यांनी जाहीर सभा घेतल्या होता. मात्र दुसऱ्या दिवशी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाल्याने दौरा अर्धवट सोडून उध्दव ठाकरे मुंबईला गेले होते. दरम्यान उर्वरित दौरा पूर्ण करण्यासाठी आज उध्दव ठाकरे जिल्ह्यात येत आहेत. सिंदखेडराजा येथे दुपारी १ वाजता तर मेहकर येथे दुपारी ३ वाजता उध्दव ठाकरे सभा घेणार आहेत. उध्दव ठाकरे आज उमेदवारी घोषित करतात की त्यासाठी वेळ घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.