शरद पवार यांनी ते "मराठा की ओबोसी" जाहीर करावं ! खा. प्रतापराव जाधव यांचे खुले आव्हान! शाई फेकीचा केला निषेध

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि रोहित पवार यांनी ते मराठा की ओबीसी? हे जनतेसमक्ष जाहीर करावं असं खुले आव्हान करून शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडवून दिली आहे. नामदेव जाधव यांना काळ फासण्याच्या कृत्याचाही त्यांनी निषेध नोंदविला आहे.
बुलडाण्यात निवडक प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना त्यांनी हे रोखठोक विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या जातीचे प्रमाणपत्र'व्हायरल' करणाऱ्या नामदेव जाधव यांना काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळ फासले. या घटनेचा खासदार प्रतापराव जाधव यांनी यावेळी जाहीर निषेध केला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे सार्वत्रिक केलेले जातीचे प्रमाणपत्र एका 'वेबसाईट'वरून काढलय अशी माहिती खासदार जाधव यांनी या चर्चेत दिली. ते प्रमाणपत्र चुकीचे किंवा खोटं असेल तर संबंधित 'वेबसाईट' विरुद्ध ( पवारांनी) कारवाई करायला पाहिजे . यामध्ये नामदेव जाधव यांचा काय दोष? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 
शरद पवारांचं एक प्रमाणपत्र 'ओपन' तर दुसरा सर्टिफिकेट 'ओबीसी ' असेल तर त्यांनी, बनावट प्रमाणपत्र कोणत आणि मूळ कोणत याची माहिती माध्यमांसमोर येऊन द्यावी. शरद पवार यांनी आम्ही मराठा आहोत की ओबीसी आहोत हेही जनतेला सांगावं असं खुलं आव्हान खासदार प्रतापराव जाधव यांनी केलं..