रक्तदानाच्या महायज्ञात सहभागी व्हा- शैलेशकुमार काकडेंचे आवाहन! राजर्षी शाहू फाऊंडेशन, राजर्षी शाहू मल्टिस्टेटचा उपक्रम! निमित्त संदीपदादा शेळकेंच्या वाढदिवसाचे

 
gyjg
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशन आणि राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्यावतीने संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा आणि जिल्ह्याबाहेर जवळपास ७५ ठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्यात येणार आहेत. २३ फेब्रुवारीपासून रक्तदान शिबिरांना सुरुवात झाली असून १३ मार्चपर्यंत ही शिबिरे होणार आहेत. रक्तदानाच्या या महायज्ञात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राजर्षी शाहू फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष शैलेशकुमार काकडे यांनी केले आहे.

रक्तदान हे श्रेष्ठदान दान मानले जाते. कारण तुमच्या रक्तदानाने गरजू व्यक्तीचे प्राण वाचवले जाऊ शकते. उन्हाळ्यात सर्वच रक्तपेढ्यांना रक्ताची चणचण भासते. सुटीच्या काळात नियोजीत सर्जरींची संख्या वाढलेली असते. उन्हाळ्यामुळे आजार सुद्धा वाढत असतात. या सर्वंच बाबींचा परिणाम रक्त साठा कमी होण्यावर होतो. अशा पार्श्वभूमीवर दूर्घटना घडल्यास संबंधितांना रक्त मिळणेही जिकरीचे ठरते. म्हणूनच उन्हाळ्याच्या काळात रक्ताचं नातं जोडणाऱ्या रक्तदात्यांची संख्या वाढणं महत्वाचं ठरतं. हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. 

रक्ताला पर्याय नाही

वैद्यकीय तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी रक्ताला पर्याय नाही. त्यामुळे रक्तदान करणे गरजेचे आहे. त्याद्वारेच रक्त जमा करता येते. रक्ताचा तुटवडा पडला की रक्तदानाचे आवाहन करावे लागते. मात्र, दर तीन महिन्यांनी मी रक्तदान करणारच, ही सामाजिक जाणीव नागरिकांमध्ये, विशेषकरून तरुणांमध्ये जागवायला हवी. राजर्षी शाहू परिवाराने रक्तदान शिबिरे आयोजनासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. यावेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर पंधरवड्यात सामाजिक बांधिलकी म्हणून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.