अंचरवाडी येथील शेतकऱ्यांसह सरनाईक यांचा मेरा येथील महाराष्ट्र बॅक शाखेत ठिय्या!
खात्याला लावलेले होल्ड काढा; गावपातळीवर आधार कार्डच्या माध्यमातून पैसे मिळण्याची सुविधा सुरळीत करण्याची मागणी...
Aug 28, 2024, 14:37 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्र बॅक शाखा मेरा खुर्द यांनी अंचरवाडी येथील शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावल्याने शेतकऱ्यांना गावामध्ये पैसे काढता येत नाही . त्यासाठी त्यांना बँकेत येऊ पैसे काढावे लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड व त्रास सोसावा लागत असुन गावातील सेंटरला पैसे काढले जात नसल्याने बँकेत भरगच्च गर्दी होतांना दिसत आहे. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढावा यासाठी शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी आज बँक ऑफ महाराष्ट्राच्या मेरा खुर्द शाखेत ठिय्या मांडला आहे..
जो पर्यत शेतकऱ्यांच्या अडचणी सुटणार नाही तो पर्यंत बॅक सोडणार नसल्याची भुमिका शेतकऱ्यांसह सरनाईक यांनी घेतली आहे.या समस्या प्रकरणी वरीष्ठांना मेल व्दारे कळविण्यात आले असल्याचे बॅक व्यवस्थापक यांनी सांगितले. दरम्यान इतर बॅकांकडुन गाव पातळीवर पैसे काढले जातात परंतु वयोवृद्ध लोकांना बॅकेत शासकीय योजनेचे पैसे काढण्यासाठी बॅकेत यावे लागत असल्याने मोठी हेळसांड व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
स्पेशल वाहण करुण यावं लागतं बॅकेत....
शासनाच्या विविध योजना त्याचप्रमाणे नुकसान भरपाईचे पैसे खात्यावर आले आहेत.परंतु यापुर्वी गावामध्ये निघणारे पैसे निघत नसल्याने शेतकरी व सर्वसामान्य नागरीक अडचणीत सापडले असून अनेकांना पैसे काढण्यासाठी बॅकेत यावे लागते अशा सुचना बॅकेकडुन दिल्या जात असुन वयोवृद्धांना स्पेशल वाहन करूण पैसे काढावयास यावे लागत असल्याने बॅके प्रति प्रचंड रोष निर्माण होतांना दिसत आहे .यावेळी तानाजी चिकणे,कुंदन यंगड, नामदेव सपकाळ,विलास परीहार,संजय परीहार,संजय गुप्ता,पुंजाजी कोल्हे,कासाबाई खरात, लक्ष्मीबाई शिंदे,वसुदेव परीहार, रघुनाथ भवर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.