महायुतीच्या मेळाव्यात आ.संजय कुटेंचा गौप्यस्फोट! म्हणाले...म्हणून बुलडाण्याची जागा भाजपला मागितली नाही म्हणाले...

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाण्यात आज महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळावा होत आहे. या मेळाव्यात आमदार संजय कुटेंचे भाषण चांगलेच गाजले. यावेळी आमदार कुटे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. ही जागा शिवसेनेला सुटणार आणि उमेदवार खा.प्रतापराव जाधव असणार हे मला आधीच माहीत होत, त्यामुळे ही जागा भाजपला मागितली नसल्याचे ते म्हणाले.
  उमेदवार कोण हे मला एक महिन्या पूर्वी माहीत होत. डॉ. शिंगणे साहेब आणि मी वरिष्ठांच्या संपर्कात होतो. तेव्हाच त्यांनी सांगितल.त्यामुळे आमचं व्हिजन क्लिअर होत. कार्यकर्ते संभ्रमात होते. त्यांना वाटायचं हे भाजपला उमेदवारी का नाही मागत..? त्यावेळी मी शांत होतो कारण आधीच माहिती होते की , खा. प्रतापराव जाधव हेच उमेदवार आहेत असे आ.कुटे म्हणाले. मतदारसंघात भाजपने कोणताही सर्व्हे केला नाही, खा जाधव नंबर एकवर होते आणि नंबर एकवरच राहील असे ते म्हणाले.जिल्हयाच्या विकासासाठी खा. जाधवांचा मोठा वाटा आहे. खासदारांना देशासाठी काम करावं लागत, त्यामुळे त्यांना जिल्ह्यात जास्त फिरता येत नाही, मात्र तरीही जिल्ह्यात सर्वाधिक संपर्क असलेला नेता म्हणजे खा. प्रतापराव जाधव आहेत असे आ.कुटे म्हणाले.