अर्ज दाखल केल्यावर आ.संजय गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले..मी लढावे ही जिल्हावासियांची इच्छा; अर्ज मागे घेण्याच्या प्रश्नावर म्हणाले, लढण्यासाठी भरला

 
बुलडाणा

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आमदार संजय गायकवाड यांनी आज बुलडाणा लोकसभेसाठी नामांकन अर्ज दाखल करून राजकीय खळबळ उडवून दिली. बुलडाणा लाइव्ह ने सर्वप्रथम तशी शक्यता वर्तवली होती, त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आ.संजय गायकवाड यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधून पहिली प्रतिक्रिया दिली.

  नामांकन अर्ज भरल्यावर खूप छान वाटतंय. पहिल्यांदा लोकसभेसाठी अर्ज भरलाय. मी लोकसभा लढावी अशी जिल्हावासियांची इच्छा होती. आपण शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे ते म्हणाले. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढणार आहे असेही ते म्हणाले.
  खा. प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारीला विरोध आहे का असे विचारले असता त्यावर माझा कुणालाही विरोध नाही असे ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत या विषयावर बोलणे झाले नसल्याचेही सांगितले. उमेदवारी अर्ज मागे घेणार का? या प्रश्नावर लढण्यासाठी उमेदवारी अर्ज भरल्याचे म्हणाले...