Amazon Ad

संदीप शेळकेंची "सोशल पॉवर" वाढतेय! महिनाभरात मिळवली मोठी उपलब्धी..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जसजसा लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा दिवस जवळ येईल तसतशी प्रचाराची रंगत वाढणार आहे. बॅनर ,पोस्टर, भिंतीपत्रके , पॉम्पलेट प्रचाराची ही माध्यमे तर आहेतच पण यापेक्षाही अधिक प्रभावी माध्यम म्हणून सध्या सोशल मीडीयाचा ट्रेण्ड आहे. सोशल मीडियावरील या प्रचारात अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी चांगलीच मुसंडी घेतल्याचे एकंदरीत चित्र आहे. ज्या झपाट्याने संदीप शेळके यांच्या फॉलोवर्स ची संख्या वाढली त्यावरून तसेच दिसते..
 जिल्ह्याचा शाश्वत, सर्वांगीण विकास हा अजेंडा घेऊन संदीप शेळके वन बुलडाणा मिशनच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचत आहेत. परिवर्तन पदयात्रा, श्रीराम वंदना यात्रा, परिवर्तन रथयात्रा, संवाद यात्रा या माध्यमातून निवडणुका घोषित होण्याआधीच त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला आहे. गावागावात पोहचल्याने संदीप शेळकेंची लोकप्रियता झपाट्याने वाढत गेली, आता सोशल मीडियावर देखील त्यांचे फॉलोवर्स झपाट्याने वाढलेले आहे.
 संदीप शेळके यांच्या फेसबुक पेजला ८० हजारापेक्षा जास्त से फॉलोवर्स आहेत. विशेष म्हणजे अलीकडच्या एक ते दीड महिन्यातच फॉलोवर्स ६० हजारांनी वाढले आहेत. याशिवाय वन बुलडाणा मिशन या पेजला देखील ८० हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. याशिवाय गावागावांत संदीप शेळके यांच्या समर्थकांचे व्हॉटस् अप ग्रुप आहेत, संदीप शेळके यांच्या वॉर रूम मधून तयार होणारे प्रचाराचे साहित्य, रिल्स या व्हॉटस् ॲप ग्रुपच्या माध्यमातून काही क्षणात जिल्हाभर पोहोचते.