Amazon Ad

शेंदुर्जन, दुसरबीड येथे संदीप शेळकेंचा रोड शो दणक्यात! शेळके म्हणाले, लोकांना परिवर्तन हवयं, आपला विजय निश्चित..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) जनतेचा कौल परिवर्तनाच्या दिशेने आहे, जनतेला परिवर्तन पाहिजे आहे. वन बुलढाणा मिशनने मांडलेल्या परिपूर्ण विकास संकल्पनेला जिल्हावासियांनी पसंती दिली आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा दावा वन बुलढाणा मिशनचे संकल्पक तथा बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी केला. त्यांच्या प्रचारार्थ दुसरबीड, शेंदुर्जन येथे भव्य रोडशो चे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते.  
Advt
Advt. 👆
प्रचारात आघाडी घेतलेल्या संदीप शेळकेंना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या प्रचारार्थ आज सकाळी शेंदुर्जन, दुसरबीड येथे रोडशो चे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान ठीकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी जेसीबीने शेळकेंवर पुष्पृष्टी करण्यात आली. यावेळी जनतेशी संवाद साधताना ते म्हणाले की, गेली अनेक वर्ष झाले, जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार जनतेला केला आहे. विकसित बुलढाणा जिल्ह्याचे चित्र टीपण्याचे आपले ध्येय आहे. सुरूवातीपासूनच वन बुलढाणा मिशनने जिल्हा विकासासाठी अभ्यासपूर्ण धोरणे तयार केली आहे, त्यामुळे जनतेने ठरविल्याप्रमाणे प्रस्थापितांना कायमचा आराम देवून, आपला विजय निश्चित असल्याचा दावा शेळके यांनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, मला जनतेकडून खूप प्रेम मिळत आहे. प्रस्थापित राजकारणांनी आजवर जिल्ह्याच्या विकासासाठी कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही, त्यामुळे जनतेचा त्यांच्यावर रोष आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणी विचार केला नाही. त्यामुळे आपण सर्वात आधी शेतकरी हिताचा विचार करणार आहोत. शेतमालाला भाव , शेतपांदन रस्ते, तालुक्याच्या ठिकाणी सीडहब, सिंचनाची वाढती टक्केवारी, नदीजोड प्रकल्प अशा विविध प्रकारच्या शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजना प्रत्यक्षात आपण उतरविणार आहोत. जिल्ह्यात सुशिक्षित तरुणांना रोजगार नाही त्यामुळे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एमआयडीसी तयार झाली पाहिजे हा आपला विचार आहे, बचत गटाच्या महिला भगिनींकरता ऑनलाइन बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे, गाव खेड्याच्या विद्यार्थ्यांसाठी मैदानी सरावा करता मैदान उपलब्ध झाले पाहिजे, असा सर्व विकासाचा मायक्रोप्लान आज आपल्या डोक्यात आहे, खासदार झाल्यानंतर सगळी विकास धोरणे प्रत्यक्षात दिसून येतील अशी ग्वाही शेळके यांनी दिली.