धाड, चांडोळ, उदयनगर, अमडापुरात संदीप शेळकेंच्या रोड शो ला दमदार प्रतिसाद! शेळकेंनी मांडले विकासाचे व्हिजन! आज शेंदुर्जन, दुसरबिड मध्ये रोड शो...
Apr 17, 2024, 09:21 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) जिल्ह्याचा कायापालट करायचा आहे. आजवर कधी झाला नाही, तो विकास साधायचा आहे. मुळात विकास काय, कसा असतो? ते आपण आधीच मांडलेल्या विकास मुद्द्यांवरून स्पष्ट केल आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण कटिबद्ध आहे. कारण सर्वव्यापी विकासाचे व्हिजन आपल्याकडे आहे. असे प्रतिपादन वन बुलढाणा मिशनचे संकल्पक तथा बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी केले. काल प्रचारदौऱ्या निमित्त धाड, चांडोळ, उदयनगर,अमडापुरात जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते.संदीप शेळके यांच्या प्रचारार्थत काल चिखली तालुक्यात भव्य रोडशो काढण्यात आला. या दरम्यान जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला आणि प्रचार रॅलीत सहभागही घेतला
Advt.👆
पुढे बोलताना संदीप शेळके म्हणाले की, आजवर प्रस्थापितांनी केवळ राजकारण केले, विकासावर भाष्य केले नाही. त्यामुळे सामान्य जनतेची केवळ निराशा झाली आहे. परंतु वन बुलढाणा मिशन या राजकीय चळवळीने जनतेसमोर मांडलेल्या अभ्यासपूर्ण विकास धोरणांमुळे सामान्य माणसाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
जिल्ह्यात सुशिक्षित तरुणांचे बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्या ठिकाणी एमआयडीसी निर्माण झाली पाहिजे. हे आपल्या अजेंड्यावर आहे, शेतकऱ्यांचे कल्याण होण्यासाठी नाविन्यपूर्ण धोरणे आपण आखली आहेत. त्यामध्ये सीड हब उभारणे, शेत पांदन रस्ते, सिंचनाची टक्केवारी वाढली पाहिजे, शेतमालाला भाव मिळाला पाहिजे यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार आहे, सैन्य भरतीची तयारी करणारे विद्यार्थ्यांसाठी मैदान उपलब्ध करून द्यायचे आहे, महिला बचत गटांच्या उत्पादनांना ऑनलाइन बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची आपली संकल्पना आहे, अशा पद्धतीने सर्वव्यापी विकास आपल्याला साधायचा आहे. जनतेने संधी दिल्यास जिल्ह्याचा कायापालट करून दाखवणार असेही संदीप शेळके म्हणाले.
आज शेंदुर्जन, दुसरबीड येथे रोड शो...
आज सकाळी सिंदखेडराजा तालुक्यातील शेंदुर्जन दुसरबीड या ठिकाणी संदीप शेळके यांच्या प्रचारार्थ भव्य रोड शो आयोजित करण्यात आला आहे..