संदीप शेळकेंचा आज डोणगाव, मेहकर येथे रोड शो

 
मेहकर
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांचा जिल्हाभर दणक्यात प्रचार सुरू आहे. रोड शो च्या माध्यमातून ते जनतेशी संवाद साधत आहेत. काल, जामोद, संग्रामपूर, सोनाळा येथे रोड शो ला चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान आज,१९ एप्रिलला संदीप शेळके खा.प्रतापराव जाधव यांचा गड समजल्या जाणाऱ्या मेहकर येथे रोड शो करणार आहेत. सकाळच्या सत्रात डोणगाव येथे तर दुपारच्या सत्रात ४ वाजता मेहकर येथे हा रोड शो होणार आहे.
Advt
Advt. 👆