संदीप शेळकेंची ताकद वाढली! राष्ट्रीय अल्पसंख्यांक संघटनेकडून मिळाला पाठिंबा, शेळके म्हणाले , अल्पसंख्यांकांचे प्रश्न पोटतिडकिने मांडणार...

 
sds

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) वन बुलडाणा मिशनचे संकल्पक तथा अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांना मागील चार दिवसांपासून सतत विविध संघटनेंकडून पाठिंबा मिळत आहे. आज  गुरुवारी राष्ट्रीय अल्पसंख्यांक पिछडा वर्ग या राज्यस्तरीय संघटनेकडून शेळकेंना  पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. संघटनेच्या प्रसिद्धी पत्रकातून ही माहिती देण्यात आली आहे. 

Advt

advt.

अल्पसंख्यांक समाजातील विविध प्रकारच्या समस्या व पिढीत जनतेच्या प्रश्नांना शासन दरबारी मांडून ते प्रश्न सोडून घेण्याकरीता हा पाठिंबा देण्यात आला आहे. पाठिंबा जाहीर होताच, अल्पसंख्यांकांचे प्रश्न पोट तिडकिने मांडणार असल्याची ग्वाही शेळके यांनी दिली. यापूर्वी देखील करणी सेना, भारतीय त्रिदल माजी सैनिक सेवा संघ, गोर सेना यांसारख्या विविध संघटनेंकडून शेळके यांना पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे शेळकेंची ताकद दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे.