संदीप शेळकेंची परिवर्तन रथयात्रा आज मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यात! "या" १४ गावांत होणार कॉर्नर सभा

 
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) वन बुलढाणा मिशनचे संकल्पक तथा शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या नेतृत्वात निघालेली परिवर्तन रथयात्रा जिल्हाभर सुरू आहे. १० फेब्रुवारीला मोताळा तालुक्यातून या रथयात्रेला सुरुवात झाली होती. त्यानंतर शेगाव, खामगाव, संग्रामपूर, मेहकर, लोणार या तालुक्यांचा प्रवास करीत ही यात्रा आज शुक्रवार,२२ मार्च रोजी सिंदखेड राजा तालुक्यात यात्रा पोहोचत आहे. ठिकठिकाणी रथयात्रेला भरभक्कम प्रतिसाद पाहायला मिळत आहे.
 आज सिंदखेडराजा तालुक्यात गावागावात संदीप शेळके कॉर्नर सभा घेणार आहेत. यामध्ये आपल्या भाषणातून विकासाचे व्हिजन मांडून परिवर्तनाचा निर्धार जनतेसमोर व्यक्त करणार आहेत. सकाळी सावखेडतेजन ,आडगाव राजा, वडाळी, सुलजगाव धांदरवाडी ,वसंतनगर डावरगाव, अंचली या गावांमध्ये यात्रा दाखल होणार आहे. त्यानंतर सायंकाळी वर्डदी, बुट्टातांडा, धानोरा सांगेफळ या ठिकाणी यात्रा पोहचणार असून रात्री रूमना आणि सायंदेव या गावात कॉर्नर सभा होणार आहे.