देऊळगावमही, देऊळगावराजात संदीप शेळकेंचा भव्य रोड शो! देऊळगावराजा तालुक्याला सिड हब बनवणार; संदीप शेळकेंचे प्रतिपादन! म्हणाले, शेतकऱ्यांचे कल्याण झाले पाहिजे

 
Bbbb

देऊळगाव राजा:(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संपूर्ण जगाचे पोषण करणाऱ्या शेतकऱ्यांवरील संकटे अजूनही कमी झालेली नाहीत. मागील दोन दिवसांपूर्वीच बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह, गारपिटीमुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याआधीही शेतकऱ्यांवर संकटे होतीच आणि आताही आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही, पिक विम्याचे पैसे पूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाहीत. त्यामुळे सद्यस्थितीत शेतकऱ्यांना आधार देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात जवळपास पाच लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधव आहेत. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जनतेने संधी दिली तर शेतकऱ्यांच्या हिताच्या कल्याणकारी योजना आपण राबवणार आहोत. शेतमालाला भाव मिळण्यासाठी विशेष प्रयत्न मी करणार आहे, जिल्ह्यात सिंचनाची टक्केवारी वाढली पाहिजे तसेच सिंदखेडराजा आणि देऊळगाव राजा तालुक्यात खाजगी कंपन्यांच्या सहयोगातून सीड हब आपण उभारणार आहोत.  शेतकऱ्यांचे कल्याण होईल असे कार्य  आपण करणार आहे. असे  प्रतिपादन वन बुलढाणा मिशनचे संकल्पक तथा बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी केले. आज १५ एप्रिलला देऊळगाव मही, देऊळगाव राजा  येथे त्यांच्या प्रचारार्थ भव्य रोडशो पार पडला. यादरम्यान जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते.

  अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांच्या प्रचारार्थ आज सकाळी देऊळगाव मही येथे उत्स्फूर्त प्रतिसादात रोडशो संपन्न झाला. त्यानंतर सायंकाळी देऊळगाव राजा शहरात छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना अर्पण करून प्रचार रॅली काढण्यात आली.  बालाजी वेस, बालाजी मंदिर, माळीपुरा, धोंडीराम महाराज मंदिर, जालना रोड, अशा मार्गाने देऊळगाव राजा शहरात प्रचंड प्रतिसादात प्रचार रॅली संपन्न झाली. दरम्यान झालेल्या रोडशो  मध्ये शहरवासीयांनी  मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. 

 पुढे बोलताना संदीप शेळके म्हणाले की,  बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी कायम अडचणीत सापडतो. प्रस्थापितांच्या राजकारणामुळे शेतकऱ्यांवर दुर्लक्ष झाले आहे. आज शेतकऱ्याला कोरड्या सहानुभूतीची नाही तर प्रत्यक्ष मदतीची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केले पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला भाव, सिंचन सुविधा हे आपल्या विकास आराखड्यातील प्रमुख मुद्दे आहे. शेतपांदन  रस्ते निर्मितीचा विचार आजवर कोणाच्याही लक्षात आला आहे.  ती नाविन्यपूर्णता आपल्याकडे आहे, शेतकऱ्यांच कल्याण झाले पाहिजे हे आपले ध्येय आहे. आणि त्यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे संदीप शेळके म्हणाले.