Amazon Ad

मातृतीर्थ सिंदखेडराजा, खामगावात संदीप शेळकेंची 'लक्षवेधी'प्रचार रॅली! प्रस्थापितांनी आजवर जनतेची फसवणूक केल्याचा शेळकेंचा आरोप, म्हणाले तुम्ही बदल घडवा मी जिल्हा घडवितो!

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) प्रस्थापित राजकारण्यांनी सत्तेसाठी राजकारण केले. निवडणुक आली की त्यांना सामान्या जनता आठवते. विकासाची भाषा कधी त्यांनी केली नाही. केवळ जिल्ह्यातील जनतेची फसवणूक त्यांनी केली आहे. त्यामुळे तुम्ही बदल घडवा, मी जिल्हा घडवितो असे आवाहन संदीप शेळके यांनी केले.काल  मातृतीर्थ सिंदखेडराजा, खामगाव येथे संदीप शेळके यांच्या प्रचारासाठी भव्य रोडशो काढण्यात आला. यावेळी दोन्ही शहरात अतिविराट जनसमुदाय रॅली मध्ये सहभागी झाला होता. यावेळी जनतेशी संवाद साधताना ते बोलत होतो.

 अपक्ष उमेदवार तथा वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांचा जिल्हाभर धुमधडाक्यात प्रचार सुरू आहे. अपक्ष असूनही प्रचारात त्यांनी कोणतीही कसर ठेवली नाही. ठिकठिकाणी त्यांच्या रोडशो चे आयोजन करण्यात येत आहे. जेसीबीने पुष्पृष्टी करत शेळकेंचे स्वागत करण्यात येत आहे. विकासाच्या मुद्द्यांवर बोलत असल्याने शेळकेंना भरभक्कम प्रतिसाद मिळत आहे. 

पुढे बोलताना संदीप शेळके म्हणाले की,  मी वन बुलढाणा मिशन च्या माध्यमातून ७० संवाद मेळावे घेतले, सोयाबीन कापसाच्या भाव वाढीसाठी पदयात्रा काढली, पाचशे पेक्षा आधिक गावात परिवर्तन रथयात्रा काढली, जवळपास सातशे पेक्षा अधिक गावांना आतापर्यंत भेटी दिल्या. आणि जेव्हा विद्यमान खासदार म्हणतात मला १५० दिवस संसदेत रहावे लागते तर मला हसू येते. गेल्या सहा महिन्यात मी संपूर्ण बुलढाणा जिल्हा पिंजून काढला आहे. प्रस्थापित राजकारण्यांनी आजवर सत्तेसाठी राजकारण केलेले आहे. निवडणूक आली की त्यांना सामान्य जनतेची आठवण येते. असा आरोप शेळके यांनी केला. त्यामुळे जनतेने बदल घडवून परिवर्तन घडविले पाहिजे,  मी  निश्चितपणे जिल्हा घडवण्यासाठी कटिबद्ध आहे असे शेळके म्हणाले.  खासदार झाल्यावर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एमआयडीसी आपण उभारणार आहोत, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी तालुक्यात सीड हब उभारणे, पांदण रस्त्याची निर्मिती करणे, सिंचनाची टक्केवारी वाढवणे यासाठी आपण प्रामुख्याने प्राधान्य देणार आहोत, तरुण भावांना सैन्य भरतीच्या तयारीसाठी मैदान उपलब्ध करून देणार आहोत, माता भगिनींसाठी बचत गटातून ऑनलाइन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार आहोत, जिल्ह्याला पर्यटन दृष्ट्या विशेष महत्त्व असले तरी आजवर पाहिजे तसा विकास झाला नाही. बुलढाणा जिल्हा पर्यटन हब बनवण्याचे आपले ध्येय आहे, जिल्ह्यात कारखानदारी वाढली पाहिजे, पैठणच्या धरतीवर  शेगावात संतपीट साकारल्या गेले पाहिजे, यासह विविध अभ्यासपूर्ण धोरणांतून बुलढाणा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करून दाखवणार असेही शेळके म्हणाले.

Iisje