संदीप शेळकेंचा आज चिखली तालुक्यात प्रचार दौरा! धाड, चांडोळ आणि उदयनगर, अमडापुरात रोड शो चे आयोजन; मतदारांना घालणार विकासाची साद...

 
धाड(गुलाब गायकवाड:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वन बुलडाणा मिशन ही राजकीय लोकचळवळ घेऊन बुलडाणा जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन मांडणाऱ्या संदीप शेळके यांचा आज,१६ एप्रिलला चिखली तालुक्यात प्रचार दौरा आहे. चिखली तालुक्यातील धाड, चांडोळ, उदयनगर आणि अमडापूर येथे आज संदीप शेळके यांचा रोड शो होणार आहे. यावेळी ते मतदारांशी संवाद साधून विकासाची साद घालणार आहेत.
Advt
 काल, देऊळगावमही आणि देऊळगावराजा येथे संदीप शेळके यांचा रोड शो झाला.त्याआधी १४ एप्रिलला त्यांनी काढलेली भीम वंदना यात्रा देखील लक्षवेधी ठरली. मतदारांची आपल्याला पसंती मिळत आहे, जिल्ह्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊन ठेवायचे आहे असे म्हणत संदीप शेळके मतदारांना परिवर्तनाची साद घालत आहेत. आज सकाळच्या धाड आणि चांडोळ तर दुपारच्या सत्रात उदयनगर आणि अमडापुरच्या मतदारांशी संदीप शेळके संवाद साधणार आहेत.