संदीप शेळकेंचा शहरासह ग्रामीण भागात झंझावाती प्रचार ; मालती शेळके प्रचारासाठी पोहचल्या जिल्ह्यातील गावोगावी! शेळकेंच्या प्रचारासाठी कुटुंब एकवटले, प्रचारात मुसंडी..
Advt
जनतेचा जाहीरनामा प्रसिद्ध करत, जिल्हा विकासाचे ध्येय बाळगून निवडणूक लढत असल्याचे शेळके सांगतात. याआधी परिवर्तन रथयात्रेच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात विकासाचे व्हिजन मांडले. त्यांनी मांडलेल्या अभ्यासपूर्ण विकास धोरणांना जिल्हाभर पसंती मिळाली आहे, बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीसाठी केवळ तीन दिवसांचा कालावधी बाकी आहे, त्यापूर्वी संदीप शेळके यांचा संपूर्ण जिल्ह्यात झंझावाती प्रचार सुरू आहे. त्यांच्या प्रचारासाठी मालतीताई शेळके गावोगावी पोहोचल्या आहेत, संपूर्ण शेळके कुटुंब प्रचारासाठी एकवटले असून जोमाने प्रचार सुरू आहे. शहरा ठिकाणी निघालेल्या प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, ठिकठिकाणी संदीप शेळके यांचे जंगी स्वागत होत आहे. दरम्यान, जनतेशी संवाद साधताना 'सत्तेसाठी नाही तर विकासासाठी राजकारण करणारा नेता जनतेला पाहिजे', जनतेचे हे प्रेम म्हणजे विजयाचा विश्वास आहे. त्यामुळे परिवर्तन घडणार आणि विजय होणार असल्याचे शेळके म्हणाले.