संदीप शेळके आजपासून लोणार तालुक्यात करणार 'परिवर्तनाचा जागर'!

 
Shelke

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वन बुलढाणा मिशनचे संस्थापक तथा शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या नेतृत्वात निघालेल्या परिवर्तन रथयात्रेने जिल्हाभरातील शेकडो गाव खेडी पिंजून काढली आहे.  शेळके विकासाचे ध्येय मांडत असल्यामुळे गावोगावी रथयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. मागील ४० दिवसांपासून सुरू असलेली वन बुलढाणा मिशनची परिवर्तन रथयात्रा आज बुधवार, २० मार्चला लोणार तालुक्यात 
दाखल होणार आहे.

Sss

सकाळी लोणार तालुक्यातील गायखेड, कुंडलस, पांग्रा डोळे, टिटवी, गोत्रा, नांद्रा सावरगाव मुंडे, शिवनी जाट त्या गावांमध्ये रथयात्रा पोहोचणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजेपासून  पुढील गावांसाठी यात्रा रवाना होणार आहे. त्यामध्ये किन्ही, तायफळ, बिबखेड, देवा नगर, या गावात यात्रा पोहोचणार आहे. सायंकाळी भुमराळा आणि किनगाव जट्टू येथे यात्रा दाखल होईल.