संदीप शेळके १२ एप्रिलला जळगाव जामोद तालुक्यात करणार भव्य रोड शो! जनता जनार्दनासोबत साधणार संवाद...

 
विकासाची
जळगाव जामोद(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन लोकसभेच्या रणांगणात उतरलेले वन बुलढाणा मिशनचे संकल्पक तथा अपक्ष उमेदवार संदीप शेळके12 एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव, पिंपळगाव काळे, खांडवी या गावांमध्ये भव्य रोड शो करणार आहेत. यामाध्यमातून युवा आयडॉल संदीप शेळके हे जोरदार शक्ती प्रदर्शन करणार असून मतदारांसोबत संवाद साधणार आहेत.  
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोमात सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. विकासाचे व्हीजन घेऊन लोकसभेच्या रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. सोशल मीडियावर सुद्धा त्यांच्या प्रचाराचा जलवा बघायला मिळत आहे. 12 एप्रिल रोजी ते जळगाव जामोद तालुक्यात रोड शो करणार आहेत. यापार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आजही बुलढाणा जिल्हा हा मागासलेपणाच्या यादीत गणला जातो. जिल्हावासियांसाठी ही मोठी खेदाची बाब आहे.जगाच्या पातळीवर बुलडाणा जिल्हा हा ऐतिहासिक ,सांस्कृतिक, अध्यात्मिक तसेच पर्यटनाबाबत वैभव प्राप्त असलेला एकमेव जिल्हा आहे. तरीसुद्धा या जिल्ह्यात पाहिजे तसा विकास झाला नाही. त्यामुळे आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी ३० वर्षात काय दिवे लावले? असा प्रश्न संदीप शेळके यांनी उपस्थित करुन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण लोकसभेच्या रणांगणात उतरल्याचे त्यांनी सांगितले.  
विकासाची ब्लू प्रिंट तयार...
जिल्ह्याचा मागासलेपणाचा कलंक दूर करण्यासाठी वन बुलढाणा मिशन या राजकीय चळवळीची सुरुवात करण्यात आली आहे. या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ब्ल्यू - प्रिंट तयार केली आहे. जनतेने खासदारकीची संधी दिली तर त्यावर पुरेपूर अंमलबजावणी करणार असल्याचे संदीप शेळके म्हणाले. जिल्ह्यात परिवर्तनाच्या माध्यमातून विकासाची गंगा आणायची आहे. नदीजोड प्रकल्प, प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी, उच्च दर्जाचे शिक्षण, महिला सक्षमीकरण, सिंचनाची सोय असा विस्तारित विकास अजेंडा घेऊन परिवर्तनाच्या दिशेने वन बुलढाणा मिशनचे मार्गक्रमण सुरु आहे. तुम्ही बदल घडवा मी जिल्हा घडवतो असे ते यावेळी म्हणाले.