Amazon Ad

संदीप शेळके आज फोडणार प्रचाराचा नारळ! संत नगरी शेगावातून होणार प्रचाराचा शुभारंभ; शेगावात आज भव्य रोड शो; संदीप शेळकेंनी घेतले गुरूंचे आशीर्वाद..

 
शेगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वन बुलडाणा मिशनचे संकल्पक तथा बुलडाणा लोकसभेसाठी अपक्ष रिंगणात उतरलेले उमेदवार संदीप शेळके आज,१० एप्रिलला प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. संत नगरी शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन संदीप शेळके प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत.

 Ghjj

Vjjk

    advt

जिल्ह्याचा सर्वांगीण विकास ही संकल्पना घेऊन संदीप शेळके निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काल,९ एप्रिलला त्यांनी त्यांच्या बुलडाणा येथील निवासस्थानी परिवर्तनाची अनोखी गुढी उभारून सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. १० फेब्रुवारीपासून शेळके यांनी लोकसभा क्षेत्रात परिवर्तन रथयात्रा काढून जिल्हा पिंजून काढला होता, त्यावेळी दमदार प्रतिसाद परिवर्तन रथयात्रेला मिळाला होता. ३ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेळके यांचे समर्थक हजारोंच्या संख्येने बुलडाण्यात दाखल झाले होते. दरम्यान निवडणूक आयोगाकडून अधिकृतरित्या चिन्हाचे वाटप झाल्यानंतर आता संदीप शेळके आजपासून प्रचाराचा शुभारंभ करीत आहेत, शेगावात होणाऱ्या रोड शो ने या प्रचाराची सुरूवात होणार आहे, त्याआधी आज सकाळी पळसखेड सपकाळ येथे जाऊन संदीप शेळके यांनी गुरुवर्य हरि चैतन्य स्वामींचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.


शेगाव शहरात सायंकाळी ४ वाजता रोड शो ची सुरुवात होईल. शेगाव शहरातील वाटिका चौक, जगदंबा चौक, एमएसईबी चौक, रेल्वे स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक , भैरव चौक, शिवनेरी चौक, मुरारता चौक, चित्रकला चौक, माळीपुरा चौक, गणेश नगर, गांधी चौक या मार्गाने संदीप शेळके यांचा रोड शो होणार आहे, यावेळी शेळके मतदारांची संवाद साधणार आहेत. शेगाव शहरातील मतदारांनी या रोड शो मध्ये सहभागी होण्याचे आवाहन वन बुलडाणा मिशनच्या वतीने करण्यात आले आहे.