Amazon Ad

बालाजी सोसे यांच्या उपोषणाला संदीप शेळकेंचा पाठिंबा! शेतकऱ्यांच्या लढ्यात खंबीरपणे साथ देण्याची दिली ग्वाही

 
सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पळखेड चक्का येथील बालाजी सोसे यांनी पुन्हा एकदा उपोषणास्त्र उपसले आहे. वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी २९ फेब्रुवारी रोजी उपोषणाला भेट देऊन पाठिंबा दिला. सोसे यांच्या प्रकृतीची त्यांनी विचारपूस केली. शेतकऱ्यांच्या लढ्यात खंबीरपणे साथ देऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिले. 
गड
                       जाहिरात 👆
सिंदखेडराजा, देऊळगावराजा तालुक्यात २६ नोव्हेंबर २०२३ रोजी वादळी वाऱ्यासह प्रचंड गारपीट झाली होती. यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात शेडनेडच्या माध्यमातून बीजोत्पादनाची शेती करतात. वादळी वारा आणि गारपिटीमुळे शेडनेटचे मोठे नुकसान या भागात झाले होते. शेडनेट उभारणे हे आधीच खर्चिक असताना झालेल्या नुकसानीमुळे या भागातील शेतकरी संकटात आहे. शेडनेटच्या नुकसानीला बागायती क्षेत्रात समाविष्ट करून या नुकसानीचा पीक विमा मिळावा या मागणीसाठी पळसखेड चक्का येथील शेतकरी बालाजी सोसे यांनी डिसेंबर महिन्यात आमरण उपोषण केले होते. त्यावेळी लेखी आश्वासन देऊन सोसे यांचे उपोषण अधिकाऱ्यांनी सोडवून घेतले होते. मात्र जवळपास ३ महिन्यांचा कालावधी उलटून देखील सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार झाला नाही. त्यामुळे बालाजी सोसे यांनी २८ फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. 
शेतकऱ्यांच्या याच मागण्यांसाठी वन बुलडाणा मिशनने देखील सिंदखेडराजा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. शेडनेट शेतीच्या नुकसानीला एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत मिळायला पाहिजे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या पाठीशी मायबाप सरकारने उभे राहिले पाहिजे. जनतेने निवडून दिले लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चुप्पी साधतात. त्यांनी सरकारला धारेवर धरले पाहिजे. मात्र असे होतांना दिसत नाही. असे सांगून संदीप शेळके यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.