अवकाळीने खचलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले संदीप शेळके! शेतकऱ्यांना स्पेशल मदतीचे पॅकेज देण्याची मागणी;

म्हणाले, शेतकऱ्यांना सन्मानाने जगता येईल अशी धोरणे आखण्याची गरज! परिवर्तन रथयात्रेला शेगाव तालुक्यात उदंड प्रतिसाद 
 
शेगाव
शेगाव(संतोष देठे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खरीप हंगामात दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. सोयाबीन कापसाचे उत्पादन तर घटलेच शिवाय भाव पडल्याने उत्पन्न देखील घटले, शेतकऱ्यांच्या हातात खर्च वजा जाता दमडी देखील उरली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातून अपेक्षा होती, मात्र रब्बी हंगामात देखील अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतकऱ्यांची दैना उडाली आहे. त्यामुळे मायबाप शेतकऱ्यांच्या अडचणीचा विचार करून सरकारने तातडीने स्पेशल पॅकेज ची घोषणा करावी अशी मागणी वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी केले. वन बुलडाणा मिशनच्या परिवर्तन रथयात्रेच्या निमित्ताने संदीप शेळके सध्या शेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत, आज,१६ फेब्रुवारीला सायंकाळी शेगाव तालुक्यातील सांगवा येथील सभेत बोलतांना संदीप शेळके यांनी उपरोक्त मागणी केली. त्याआधी संदीप शेळके यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करीत शेतकऱ्यांना धीर दिला.
पुढे बोलतांना संदीप शेळके म्हणाले, दुष्काळाची आणि पीक विम्याची रक्कम देखील अजून अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यातच आता अवकाळी पाऊस आणि गारपीटीने मोठे नुकसान झाले, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली तेव्हा झोपलेला गहू पाहून मन सुन्न झाल्याचे संदीप शेळके म्हणाले. शेतकऱ्यांना केवळ सन्मान निधी देऊन चालणार नाही तर शेतकऱ्यांना सन्मानाने जगता येईल अशी धोरणे आखण्याची गरज असल्याचे संदीप शेळके यावेळी म्हणाले..
    जनतेने परिवर्तन करण्याचा निर्धार पक्का केलाय..
  वन बुलडाणा मिशन ही राजकीय लोकचळवळ जिल्ह्याच्या विकासासाठी सुरू केल्याचे सांगत जिल्ह्याचा मागासलेपणाचा कलंक पुसायचा असल्याचे संदीप शेळके म्हणाले. रोजगार,शिक्षण, दळणवळण, आरोग्य, पर्यटन, महिला सशक्तीकरण या सर्वच विषयावर आपला बुलडाणा जिल्हा अग्रक्रमावर न्यायचा आहे, त्यासाठी राजकीय परिवर्तनाची आवश्यकता असल्याचे संदीप शेळके म्हणाले. यासाठीच जनतेच्या म्हणण्यानुसार आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून जनतेने आता परिवर्तनाचा निर्धार पक्का केल्याचे संदीप शेळके म्हणाले..
  या गावांत पोहचला परिवर्तनाचा विचार...
 परिवर्तन रथयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या दुसऱ्या दिवशी ही यात्रा शेगाव तालुक्यातील कालवड, भास्तन, चिंचखेड, संगोडा, डोलारखेड, माटरगाव, बेलुरा, निंबी, जलंब स्टेशन, जलंब, पहुरजीरा, कुरखेड, एकफळ, आळसना, सांगवा, तिव्हान बु, तिव्हान खु, टाकळी धारव व शेवटी मुक्कामी जानोरी या गावी पोहचली. सर्वच गावांत या यात्रेला उदंड प्रतिसाद मिळाला..