Amazon Ad

प्रचाराची रणधुमाळी सोडून संदीप शेळके अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर! नुकसानीची १०० टक्के मदत देण्याची मागणी

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच उमेदवार ताकदीने प्रचारात उतरले आहेत. दरम्यान वन बुलडाणा मिशनचे संकल्पक तथा अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी प्रचार बाजूला ठेवून अतिवृष्टीने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेट देत शेतकऱ्यांना धीर दिला. शेतकऱ्यांना नुकसानीची १०० आहेत% मदत तात्काळ मिळाली पाहिजे अशी मागणी यावेळी संदीप शेळके यांनी केली.
Advt
Advt
 Advt. 👆
काल ९ एप्रिल ला जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. आधीच खरीप हंगामातला दुष्काळ, रब्बी हंगामातील अतिवृष्टीने शेतकऱ्याचे उत्पन्न घटले आहे. त्यात आता पुन्हा एप्रिल मधल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ज्वारी, टोळाचा, कांदा आणि उशिरा पेरलेल्या गव्हाचे मोठे नुकसान झाले आहे. संदीप शेळके यांनी आज गणेशपुर येथे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. "शेतकऱ्यांना मायबाप सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे.
Rt
निवडणुकीच्या धामधुमीत सत्ताधारी प्रचारात व्यस्त असतील, पण काही गोष्टी बाजूला ठेवून प्राधान्याने आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून येण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेची आहे. तातडीने पंचनामे करून शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी संदीप शेळके यांनी केली. यावेळी संदीप शेळके यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा करून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.