वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके ३ एप्रिलला भरणार उमेदवारी अर्ज! अपक्ष की कुणाचा पाठींबा? चर्चांना उधाण
Updated: Mar 28, 2024, 20:49 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. परिवर्तन रथयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा त्यांनी पिंजून काढला. आता ते लोकसभा उमेदवारीचा अर्ज ३ एप्रिल रोजी दाखल करणार आहेत. वन बुलडाणा मिशनच्या कार्यालयातून एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान संदीप शेळके अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार की कुणाचा पाठिंबा घेणार यावर विविध चर्चांना उधाण आले आहे.
जिल्ह्यातील कष्टकरी, शेतकरी, तसेच तरुणांच्या भवितव्यासाठी संदीप शेळके यांनी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आपण कटीबद्ध असून विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवणार असल्याचे संदीप शेळके यांनी म्हटल्याचे प्रसिध्दी पत्रकात नमूद आहे. दहा महिन्यांपूर्वी संदीप शेळके यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता. त्यादृष्टीने जिल्हाभर परिवर्तन रथयात्रेच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. यादरम्यान त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता ३ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.