वन बुलडाणा मिशनचे संदीप शेळके उद्या भरणार उमेदवारी अर्ज! भव्य रॅली आणि सभेचे आयोजन! कसा आहे कार्यक्रम वाचा...

 
सस
बुलडाणा(बुलढाणा लाईव्ह वृत्तसेवा):वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. परिवर्तन रथयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा त्यांनी पिंजून काढला. आता ते लोकसभा उमेदवारीचा अर्ज उद्या ३ एप्रिल रोजी दाखल करणार आहेत. यावेळी भव्य रॅली आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.वन बुलडाणा मिशनच्या कार्यालयातून एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
 जिल्ह्यातील कष्टकरी, शेतकरी, तसेच तरुणांच्या भवितव्यासाठी संदीप शेळके यांनी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आपण कटीबद्ध असून विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवणार असल्याचे संदीप शेळके यांनी म्हटल्याचे प्रसिध्दी पत्रकात नमूद आहे. दहा महिन्यांपूर्वी संदीप शेळके यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता. त्यादृष्टीने जिल्हाभर परिवर्तन रथयात्रेच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. यादरम्यान त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता उद्या ३ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी १० वाजता जिजामाता प्रेक्षागर जवळील टिळक नाट्य क्रीडा मंडळाच्या मैदानात जाहीर सभा व त्यानंतर संगम चौक, गांधी भवन, बाजार गल्ली, सोनार गल्ली, कारंजा चौक, भोंडे सरकार चौक तर एडेड चौक या मार्गाने भव्य रॅली निघणार आहे. त्यानंतर संदीप शेळके उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हाभरातील गावखेड्यातील तमाम शेतकरी, कष्टकरी ,शहरी नागरिकांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन वन बुलडाणा मिशनच्या वतीने करण्यात आले आहे.