संदीप शेळके डॉ.राजेंद्र शिंगणेंच्या भेटीला! लोकसभा निवडणुकीसाठी आशीर्वाद घेतले

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे वारे जोरदार वाहू लागले आहे. आता उमेदवारांनी भेटीगाठींवर जोर दिला आहे. वन बुलडाणा मिशनचे संकल्प कथा अपक्ष उमेदवार संदीप शेळके आज माजी मंत्री तथा आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या भेटीला पोहचले.
   बुलडाणा येथील डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या निवासस्थानी संदीप शेळके यांनी त्यांची भेट घेतली. संदीप शेळके यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट करून त्याबद्दलची माहिती दिली." शिंगणे साहेब खऱ्या अर्थाने लोकनेते आहेत. राज्यात मंत्री असतांना त्यांनी केलेल्या कामांची आजही चर्चा होते. स्वाईन फ्ल्यू आणि कोरोना या राज्यावर आलेल्या दोन संकटांना शिंगणे साहेबांनी अतिशय कौशल्याने हाताळले. शिंगणे साहेबांशी विविध विषयांवर चर्चा केली, बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिंगणे साहेबांचे आशीर्वाद घेतले." असे संदीप शेळके यांनी फेसबुकवर लिहिले आहे. यासंदर्भात संदीप शेळके यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केली असता "या भेटीचे काही राजकीय अर्थ लावू नयेत, शिंगणे साहेब माझ्यासाठी श्रद्धास्थानी आहेत, त्यामुळे त्यांचे आशीर्वाद घेतले" असे संदीप शेळके म्हणाले.