संदीप शेळकेंना भारतीय त्रिदल माजी सैनिक सेवा संघाचा पाठींबा! संदीप शेळकेंनी मानले आभार

 
Hvch
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) वन बुलडाणा मिशनचे संकल्पक तथा बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांना विविध संघटनेचा, समाजातील विविध घटकांचा पाठिंबा मिळत आहे. आता चिखली तालुक्यातील भारतीय त्रिदल माजी सैनिक सेवा संघाच्या वतीने शेळकेंना पाठिंबा मिळाला आहे. माजी सैनिक सेवा संघाच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. 

 संदीप शेळके अपक्षरित्या लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. सुरूवातीपासूनच विकासाचे मुद्दे मांडून असल्यामुळे शेळकेंना भरभक्कम प्रतिसाद मिळत आहे. मागील चार दिवसांपासून त्यांना विविध समाजातून, संघटनेकडून पाठिंबा मिळत आहे. प्रचार दौऱ्यात ठिकठिकाणी संदीप शेळकेंचे जंगी स्वागत करण्यात येत आहे.  आता भारतीय त्रिदल माजी सैनिक सेवा संघाकडून त्यांना पाठिंबा मिळाल्यामुळे शेळकेंची ताकद वाढली आहे. दरम्यान, पाठिंबा जाहीर होताच संदीप शेळके यांनी सर्व माजी सैनिकांचे आभार मानले तसेच राज्यभरातील माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.