संदीप शेळकेंनी संत नगरी शेगावातून फोडला प्रचाराचा नारळ! शेगावात रोड शो करून साधला मतदारांशी संवाद;म्हणाले,मला फक्त ५ वर्षे द्या, पुढच्या वेळी प्रचाराची गरज पडणार नाही..
शेगाव शहरातून संदीप शेळके यांच्या प्रचारार्थ निघालेल्या भव्य रोड शो द्वारे शेळके यांनी मतदारांशी संवाद साधला. शेगाव शहरातील मोक्याच्या ठिकाणी संदीप शेळके यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची भूमिका विषद केली.
बुलडाणा जिल्ह्याचा आपल्याला कायापालट करायचा आहे. स्वातंत्र्यानंतर जेवढी विकासकामे जिल्ह्यात झाली नाहीत त्यापेक्षा अधिक गतीने काम आपण पुढच्या ५ वर्षात करू असे संदीप शेळके म्हणाले. बुलडाणा जिल्ह्याची ओळख आपल्याला विश्वपटलावर न्यायची आहे. शेगाव, लोणार, सिंदखेडराजा, ज्ञानगंगा अभयारण्य यासह जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करायचा आहे. प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी झाली तर रोजगाराचा प्रश्न सुटेल. शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न, तरुण आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू. राजकीय इच्छाशक्ती असेल तर सर्व काही शक्य आहे असे म्हणत शेळके यांना मतदारांना मतरुपी आशीर्वाद देण्याचे आवाहन केले. मी संसदेत पोहचलो तर पुढच्या ५ वर्षात असे काम करील की पुढच्या निवडणुकीत प्रचार करण्याची गरज पडणार नाही असेही संदीप शेळके म्हणाले.