शुभेच्छांच्या पावसात न्हाऊन निघाले संदीप शेळके! वाढदिवसानिमित्त ५० ठिकाणी सामाजिक उपक्रमांचे आयोजन...

 
Shelke
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) वन बुलढाणा मिशनचे संकल्प तथा राजश्री शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मोताळा, मलकापूर, जळगाव जामोद,नांदुरा,खामगाव, शेगाव, लोणार या तालुक्यातील विविध गावात रक्तदान शिबिर, रुग्णांसाठी फळ वाटप , शाळकरी विद्यार्थ्यांना वही पेणचे वाटप अशा कार्यक्रमाने संदीप शेळके यांचा वाढदिवस अभिनव उपक्रमांनी साजरा झाला. त्यातून मिळणाऱ्या शुभेच्छांनी न्हाऊन निघाल्याची भावना शेळकेंनी व्यक्त केली.
आज बुधवार, १३ मार्च रोजी सकाळीच संदीप शेळके यांनी चिखली येथे आई रेणुका देवीचे दर्शन घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून त्यांनी चिखली ते बुलढाणा अशी बाईक रॅली काढली. दरम्यान असंख्य युवकांनी बाईक रॅलीत सहभाग घेतला होता. त्यानंतर बुलढाणा शहरातील गर्दे हॉल या सभागृहात त्यांनी आपल्या हितचिंतकांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. याप्रसंगी बुलढाण्यातील हितचिंतकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच विविध तालुक्याच्या गावागावात वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये बुलढाणा, चिखली , सुंदरखेड, नांदुरा, चांदुर बिस्वा, धामणगाव बढे, यासह अन्य गावात रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम पार पडला. त्यासोबतच मूक बधिर विद्यालयात विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले. तसेच मेहकर,देऊळगाव राजा, चिखली, खामगाव, शेगाव या तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप करण्यात आले. शिवाय संग्रामपूर येथे विद्यालयीन परिसरात व सार्वजनिक ठिकाणी कचरा व्यवस्थापनासाठी कचराकुंडी देण्यात आली. जिल्हाभरात एकूण ५० ठिकाणी वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे संदीप शेळके यांचा वाढदिवस अभिनव उपक्रमांनी साजरा झाला. मिळालेल्या सर्व शुभेच्छांनी न्हाऊन गेल्याची भावना संदीप शेळके यांनी शेवटी व्यक्त केली.