क्रिकेट स्पर्धेतून गुणी खेळाडू समोर येतील संदीप शेळकेंचे प्रतिपादन! शिरपूर येथे राजर्षी शाहू चषक क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ

 
Ghii
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):ग्रामीण भागात सातत्याने क्रिकेट स्पर्धा आयोजित झाल्या पाहिजेत. यामाध्यमातून खेळभावना वाढीस लागेल. आपल्या भागातील गुणवत्तेला संधी मिळेल. क्रिकेट स्पर्धेतून गुणी खेळाडू समोर येतील, असे प्रतिपादन राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी केले. 

राजर्षी शाहू मल्टिस्टेट व ब्लॅक पॉयझन क्रिकेट क्लबच्या संयुक्त विद्यमाने शिरपूर येथे 'राजर्षी शाहू चषक २०२३' टेनिस बॉल क्रिकेटच्या खुल्या सामन्यांस २२ फेब्रुवारी रोजी प्रारंभ झाला. यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. उदघाटन चिखली येथील राजे संभाजी अर्बनचे अध्यक्ष शिवराज पाटील यांच्या हस्ते झाले. पुढे बोलतांना संदीप शेळके म्हणाले,  राजर्षी शाहू परिवार सदैव खेळाडूंच्या पाठीशी उभा राहिला आहे. राजर्षी शाहू चषक आयोजनामागे हीच प्रांजळ भावना आहे. खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा संपन्न व्हावी. याकरिता ब्लॅक पॉयझन क्रिकेट क्लबच्या खेळाडूंनी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.

यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर, डोंगरखंडाळा उपसरपंच श्याम पाटील सावळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सहसचिव ऋषीकेश म्हस्के, दिनकर शेळके, जनार्दन सुसर, अंकुश सुसर, तेजराव शेळके, नागेश उबरहंडे, बाळाभाऊ शेळके, श्रीराम सुसर, भारत शेळके, संजय शेळके, सतीश गव्हाणे, गणेश शेळके, विजय शेळके, संदीप सुसर, अमोल सुसर, विष्णू गव्हाणे, संदेश गवई, चंद्रकांत हिवाळे, राहुल शेलार आदींची उपस्थिती होती.