संदीप दादा म्हणजे जिल्हा विकासासाठी परिवर्तनाचा "दीप"!मालतीताई शेळके यांचे प्रतिपादन; जिल्हाभर झंझावाती प्रचार दौरा; प्रचारात जोरदार मुसंडी

 
Vbbv

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) संदीप दादा म्हणजे जिल्हा विकासासाठी परिवर्तनाचा 'दीप' आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून संदीप दादांच्या रूपाने नवे विकास पर्व सुरू होणार असल्याचे प्रतिपादन राजश्री शाहू मल्टीस्टेट अध्यक्ष मालतीताई शेळके यांनी केला. संदीप शेळके यांच्या प्रचारासाठी मालती शेळके गावोगावी पोहोचल्या आहेत. दरम्यान, हजारो मतदारांच्या भेटीगाठी घेत, त्यांच्याशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.

चिखली, मोताळा, बुलढाणा या तालुक्यांमध्ये मालती शेळके यांनी धडाकेबाज प्रचार दौरा केला. महिलांची लक्षणीय उपस्थिती यावेळी दिसून आली. गावोगावी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले, पुढे बोलताना मालती शेळके म्हणाल्या की, विकासाचे व्हिजन मांडले असल्यामुळे सुशिक्षित तरुणांचा मोठा ओढा संदीपदादांच्या बाजूने वाढला आहे. संदीप दादा शाश्वत विकासाची हमी जनतेला देत आहेत. इतकेच नाही तर सर्वांगीण, सर्वव्यापी विकास धोरणांना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी संदीप दादा कटिबद्ध आहेत. असेही त्या म्हणाल्या.
Gjjv
         Avdt