मित्राच्या लग्नासाठी चिखलीला आला होता साहील! संध्याकाळी होते लग्न,पण आज दुपारीच पोहता पोहता आला हार्ट अटॅक; चिखली शहरातील धक्कादायक घटना...

 
Hfjjf
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) चिखली शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरापासून जवळच असलेल्या जाफराबाद रोडवरील एका स्विमिंग टॅंक मध्ये पोहत असताना २२ वर्षीय तरुणाला हृदयविकाराचा झटका आला. सोबतच्या मित्रांनी त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र यादरम्यानच त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. 
साहिल जगताप २२ वर्ष असे मृतक युवकाचे नाव असून तो अकोला येथील रहिवासी आहे. मित्राच्या लग्नासाठी तो चिखली तालुक्यातील पांढरदेव येथे आला होता. आज संध्याकाळचे लग्न होते. दिवसभर रिकामा वेळ असल्याने खरेदीच्या अनुषंगाने सर्व मित्र चिखलीत पोहोचले. त्यानंतर स्विमिंग करण्यासाठी साहिल मित्रांसोबत जाफराबाद रोडवरील स्विमिंग पूल मध्ये आला. दरम्यान अचानकच, साहिलला हृदयविकाराचा झटका आला, अचानक भुरळ पडल्यासारखा तो खाली कोसळला. सगळ्या मित्रांनी तातडीने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यानच त्याची प्राणज्योत माळवली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच हळहळ व्यक्त केल्या जात आहे.