Amazon Ad

मेहकर तालुक्यात आज घोंगावणार भगवे वादळ! खा.प्रतापराव जाधव यांचा असा आहे प्रचार दौरा..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) महायुतीचे उमेदवार खा. प्रतापराव जाधव विजयाचा चौकार मारण्यासाठी तयार आहेत. खा. जाधवांच्या प्रचारार्थ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ६ विधानसभा क्षेत्रात प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. आज मेहकर तालुक्यात खा. जाधव प्रचार दौरा करणार आहेत. मेहकर तालुक्यातील विविध गावांमध्ये ते पोहचणार आहेत.
Pj
  नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान पदावर विराजमान करण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार तथा शिवसेना नेते प्रतापराव जाधव यांना निवडून आणण्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. सहाही विधानसभा मतदार संघाचे आमदार खा. जाधवांच्या विजयासाठी कामाला लागले आहे. आज स्वतः खा.जाधव मेहकर तालुक्यातील घाटबोरी, टेंभुरखेड, वरुड या गावांमध्ये पोहोचणार आहे. त्यानंतर लोणी गवळी, आंधृड, अंजनी बु या गावांत खा.जाधव यांच्या प्रचारार्थ सभा होईल.