बुलडाण्यात सत्ताधारी आमदारांना धक्का! जालिंधर बुधवंताच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीला १२ जागा; शिवसेना भाजपला ६ जागांवर मानावे लागले समाधान

 
jfhjf
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. महाविकास आघाडीला १२ जागा मिळाल्या असून विरोधकांना ६ जागा मिळाल्या आहेत.
 

   शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वातील पॅनलला अपेक्षित यश मिळाले नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत आणि आमदार संजय गायकवाड यांच्यातील लढत म्हणून या निवडणुकीकडे पहिल्या जात होते, यात बुधवंत वरचढ ठरले. माजी  मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, धिरज लिंगाडे यांनी या निवडणुकीत महाविकास आघाडीचा किल्ला लढवला. महाविकास आघाडी एकजुटीने लढत असताना आमदार संजय गायकवाड एकटेच शिंदेच्या शिवसेना व भाजपचा किल्ला लढवत होते, मात्र त्यांना यश मिळाले नाही. जालिंधर बुधवंत, राजू मुळे, सुनील सोनोने, ओमसिंग राजपूत यांचा या निवडणुकीत विजय झाला.