समृद्धीसह रस्त्यांच्या जाळ्यांमुळे कृषी, औद्योगिक विकासाला चालना! जिल्ह्यात १० हजार ६३४ कोटींची कामे; खासदार प्रतापराव जाधवांची विक्रमी कामगिरी.! वाचा कोणत्या कामावर किती खर्च झाला...

 
बुलढाणा
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):जिल्ह्यात समृद्धी महामार्गच नव्हे तर गेल्या पाच वर्षाच्या काळात ३५० किमी लांबीचे ८ राष्ट्रीय महामार्ग पुर्णत्वास गेली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुका राष्ट्रीय महामार्गाच्या नकाशावर आणण्यात महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना यश आले आहे. हे दर्जेदार रस्ते आणि समृद्धी महामार्ग आता जिल्ह्याची ईकोसिस्टीम बनविण्यास चालना मिळाली आहे. सामाजिक, औद्योगीक व कृषी बाजार पेठ विकसीत करण्यासोबतच महानगरांमध्ये जिल्ह्यातील नाशवंत उत्पादने पोहचविण्यास मदत मिळणार आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी पुन्हा एकदा प्रतापराव जाधव यांना दिल्ली जाण्याची संधी हवी आहे. गेल्या १५ वर्षात त्यांनी मतदारसंघाच्या विकासाचा पाया रचला, आता प्रत्यक्ष विकास साकारण्यासाठी त्यांना पुन्हा संधी मिळणे गरजेचे आहे. विरोधक काहीही आरोप करत असले तरी १५ वर्षातील काम हे या रस्त्यांच्या जाळ्यामुळे शक्य झाली हे वास्तव आहे. 
Advt
Advt.👆
स्मार्टसिटी मूळे शेतकऱ्यांची समृद्धी गेल्या १५ वर्षामध्ये जिल्ह्यात १० हजार ६३४ कोटी रुपयांची रस्ते विकासाची कामे करण्यात महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना यश आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी २ हजार ३२८ कोटी, केंद्रीय रस्ते योजनेतंर्गत ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी १४४.४१ कोटी रुपये, खामगाव-शेगाव जंक्शन वळणमार्गासाठी १३०३ कोटी रुपयांसह ८७ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गासाठी बुलढाणा जिल्ह्यात ६ हजार ७०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. त्यातच समृद्धीवर साबरा आणि सावगाव माळ येथे स्मार्टसिटी मंजूर करण्यात आली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातही १०० कोटी रुपये राज्य महामार्ग व पुलांच्या कामासाठी मंजूर करण्यात आले आहे. परिणामी दर्जेदार राष्ट्रीय महामार्गासह ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासावरही जोर दिल्या गेला आहे.
रस्ते विकसामुळे जिल्ह्याचे अर्थकारण बदलणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १४ एप्रिल रोजी बुलढाण्यातील महायुतीच्या मेळाव्यात समृद्धी महामार्ग एक ईकोसिस्टीम असल्याचे वक्तव्य केले होते. वरकरणी हे साधे वाक्य वाटत असले तरी त्याच्या मुळात जिल्ह्याचा सामाजिक, आर्थिक, अैाद्योगिक व कृषीविषयक विकास अंतर्भूत आहे. आठ राष्ट्रीय महामार्गा आणि राज्य महामार्गामुळे कमी कालावधीत समृद्धी महामार्गापर्यंत शेतकऱ्यांना त्यांचा माल नेता येऊन मुंबई, नागपूरसह मोठ्या शहरात अल्पावधीत तो पोहोचवणे शक्य झाले आहे. जिल्ह्याचे अर्थकारण हे कृषी क्षेत्रावर अवलंबून असल्याने या अर्थकारणाला चालना मिळून ३० हजार कोटींच्यावर जिल्ह्याचे अर्थकारण त्यामुळे पोहोचण्यास मदत होणार आहे. गेल्या १० वर्षात रस्ते विकासावर लक्ष केंद्रीत करत ही कामे पुर्ण केल्यामुळे आता त्याचे थेट कृषीवर आधारित उद्द्योगांची साखळी उभारण्यासोबतच अैाद्योगिक विकासावर लक्ष केंद्रीत केले जात आहे. आगामी पाच वर्षात प्रत्यक्षात त्याचे फायदे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व समाजाला मिळण्यास प्रारंभ होईल. 
समृद्धीवर कृषी आधारित उद्योगांसाठी नवनगर
समृद्धी महामार्गावर साबरा आणि सावरगाव माळ येथे स्मार्ट सिटी अर्थात नवरगरे उभारण्यात येत आहेत. येथे कृषी उद्योगासाठी महत्त्वपूर्ण अशी टाऊनशीप विकसीत करण्यात येणार आहे. 
कोल्ड स्टोरेज व गोदामावर भर
कोल्ड स्टोरेज आणि गोदामाच्या माध्यमातून कृषी सलग्न व्यवसाय येथे विकसीत करण्यास खासदार प्रतापराव जाधव प्राधान्य देत आहे. कोल्डस्टोरेजच्या माध्यमातून नाशवंत भाजीपाला या नवनगरामध्ये साठविण्यासाबेतच तो योग्य वेळी महानगरातील ग्राहकापर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे. कोल्डस्टोरेज (शितसाखळी) उभारण्यासाठी उद्योजकही बुलढाण्यात येतील आणि पर्यायाने येथे रोजगार निर्मितही होईल. ही पायाभूत सुविधा निर्माण करण्याची प्रक्रिया गेल्या १० वर्षात महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी पुर्ण केली.थेट शेतकऱ्याला या यंत्रणेचा लाभ देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्प्यावर जिल्हा आला आहे. वर्तमानस्थितीत जिल्ह्यात कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून २०० कोटींची उलाढाल होते. त्यामुळे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना पुन्हा संधी मिळाल्यास हा जिल्ह्याच्या सर्वांगिण उन्नतीसाठी महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
विकासासाठी पायाभूत सुविधांची साखळी
१५ वर्षात काय केले? असा प्रश्न विचारणे सोपे आहे. परंतू १५ वर्षात जिल्ह्यात या पायभूत सुविधा निर्माण केल्यामुळे आत जिल्ह्यातील कृषी, औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार आहे. जिगाव, नदीजोड प्रकल्पामुळे पाण्याची सुविधा होईल. त्यातून जिल्ह्याचे अर्थकारण अर्थात सामान्यांचे अर्थकारण सुधारेल. यासाठीच गेल्या १५ वर्षात रस्ते विकासावर भर दिला गेला आहे.