ओबीसी आरक्षणासाठी देऊळगाव राजात तासभर रोखला रस्ता; दोन्ही बाजूंनी लागली वाहनांची भलीमोठी रांग!
Jan 3, 2022, 10:09 IST
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ओबीसींचे आरक्षण जाहीर होईपर्यंत राज्यात कोणत्याही निवडणुका घेण्यात येऊ नये, या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे देऊळगाव राजा शहरातील जालना- चिखली रोडवरील बायपासलगत संत गजानन महाराज यांच्या मंदिरासमोर १ जानेवारीला रास्ता आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी तासभर रस्ता अडवून धरल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांची रांग लागली होती.
पोलिसांनी आंदोलकाना अटक करून नंतर सोडून दिले. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य तथा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज कायंदे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष खांडेभराड, राजू शिरसाठ, गणेश बुरुकूल, सदाशिव मुंढे, अरविंद खांडेभराड, प्रा. सुभाष दराडे, प्रा. दिलीप झोटे, प्रा. सदाशिव मुंडे, दीपक बोरकर, राजू शिरसाट, गणेश सवडे, रामू खांडेभराड, सुनील झोरे, सुनील शेजूळकर, प्रदीप वाघ आदींनी सहभाग घेतला.