BIG BREAKING शांतीत क्रांती..! पुन्हा एकदा प्रतापराव गणपतराव जाधवच बुलडाण्याचे खासदार! विजयी चौकार मारला! खा. जाधवांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
Updated: Jun 4, 2024, 15:35 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पुन्हा एकदा प्रतापराव गणपतराव जाधव यांनी शांतीत क्रांती केली आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून प्रतापराव जाधव चौथ्यांदा प्रतिनिधित्व करणार आहेत. आज झालेल्या मतमोजणीत प्रतापराव जाधव यांनी विरोधकांना वरचढ होऊ देण्याची एकही संधी दिली नाही. पहिल्या फेरीपासून प्रतापराव जाधव आघाडीवर होते, ती आघाडी त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा प्रतापराव जाधव यांनी ३ लाख ३० हजार ५४० एवढी मते मिळवली होती. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अद्याप ६९ हजार ९३४ मतांची मोजणी व्हायची शिल्लक असल्याने प्रतापराव जाधव यांचा विजय निश्चित समजल्या जात आहे. कारण उर्वरित मतांमधून प्रतापराव जाधव यांची आघाडी मोडण्याची शक्यता नाही.
प्रतापराव जाधव यांच्या विजयामुळे जिल्हाभरातील शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केले असून ठीक ठिकाणी फटाके फोडून पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. प्रतापराव जाधव यांनी हा विजय जनतेला समर्पित असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षात जिल्ह्यात हजारो कोटींची विकास कामे केली, आपल्या कामाची पावती आपल्याला जनतेने दिली असून पुढच्या काळात जिल्ह्याला विकासाचे मॉडेल बनवणार असल्याचे खा.जाधव म्हणाले.