संविधान जागर यात्रेला पळसखेड सपकाळ, धोडप, डोंगरशेवलीत प्रतिसाद! ग्रावकरी महिलांनी संविधानाचे गायले गीत, चिमुकल्यांचाही सहभाग! राहुल बोंद्रे म्हणाले, यात्रा फक्त संविधानाच्या संवर्धनासाठी !

 
Rb
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)मागील चार दिवसांपासून संविधान जागर यात्रा चिखली विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. १०२ गावं, ९ दिवस आणि ७०० किलोमीटर असा एकुण यात्रेचा प्रवास आहे. आज ३१ जानेवारीला, यात्रेचा पाचव्या दिवशी भरभक्कम प्रतिसाद दिसून आला. काल धोत्रा भनगोजी येथील मुक्कामा नंतर सकाळी आंधई गावापासून यात्रा सुरू झाली. आंधई, शेलसुर, शेलोडी, त्यांनतर पळसखेड सपकाळ, धोडप गावात दुपारी यात्रा पोहचली. दरम्यान या यात्रेला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला.
दुपारी पळसखेड गावात यात्रा पोहचल्यावर फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत करण्यात आले.धोडप गावात ग्रामस्थ महिला स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्या, इतकचं नाही तर त्यांनी यात्रेत संविधानाचे गीत गायले. यावेळी चिमुकल्यांनी सुद्धा सहभाग नोंदविला. दरम्यान माध्यमांशी बोलताना राहुल बोंद्रे म्हणाले की, यात्रा संविधानाच्या संवर्धनासाठी आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय अभिनिवेश नाही.त्यामुळे ज्यांची इच्छा असेल त्यांनी सहभागी व्हावं असे ते म्हणाले. पुढे यात्रा किन्होळाच्या दिशेने मार्गस्थ झाली. आजच्या दिवसाची समारोपीय सभा शिरपूर या गावी होणार आहे.