Amazon Ad

कामाचा सन्मान! भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री पदी सोहम झाल्टे यांची निवड; निवडीनंतर म्हणाले, जबाबदारीला न्याय देऊ..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा जिल्हा महामंत्री पदी सोहम झाल्टे यांची निवड करण्यात आली आहे. आज ३० मार्च, शनिवार रोजी भाजप नेते योगेंद्र गोडे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
Add
Add
                      (     जाहिरात 👆 )
यापूर्वी सोहम झाल्टे यांनी भाजपा युवा मोर्चा बुलढाणा शहर अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली. निवडीनंतर झाल्टे यांनी सर्वप्रथम भारतीय जनता पक्षातील जिल्ह्यातील नेत्यांचे आभार मानले. पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण सक्षमतेने पार पाडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नियुक्तीपत्र देताना भाजपा बुलढाणा विधानसभा प्रमुख योगेंद्र गोडे, शहराचे नेते सिद्धार्थ शर्मा, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विनायक भाग्यवंत उपस्थित होते. दरम्यान निवडणीनंतर सोहम झाल्टे यांनी पक्षाने सोपवलेल्या जबाबदारीला न्याय देणार देणार असल्याचे सांगितले.