खामगावच्या रेकॉर्ड ब्रेक सभेने प्रतापराव जाधवांच्या विजयावर शिक्कामोर्तब? निर्णायक सभा ठरली जंगी प्रदर्शन; मुख्यमंत्री म्हणाले प्रतापरावांचा 'चौकार: पक्काच!
खा.जाधवांच्या विनम्रतेने लोकांची मने जिंकली! जनसागराला साष्टांग दंडवत घातला...
या जंगी सभेप्रमाणेच मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तेंडुलकर व सेहवाग या सुपरहिट जोडीप्रमाणे शाब्दिक चौकार षटकार मारीत मैदान गाजवले. या दोघांनी उद्धव ठाकरे यांचे राजकीय वस्त्रहरण करीत खरे गद्धार तेच असल्याचे सांगितले. एकटे मोदी इंडिया आघाडीच्या २७ नेत्यांना पुरून उरले, त्यांनी देशाचा चौफेर विकास केला, जगात सन्मान मिळवून दिला. यामुळे 'अबकी बार चारसो पार अबकी बार फिरसे मोदी सरकार आणि प्रतापराव का चौकार' अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी करताच मैदान टाळ्यानी दणाणून गेले.
ऑन स्पॉट अभिनंदन आणि जाधवांची विनम्रता
दरम्यान आपल्या भाषणात आमदार संजय कुटे, आकाश फुंडकरच नव्हे तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतापरावांचा विजय निश्चित असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी तर 'चौकार निश्चित अशी ग्वाही देऊन , प्रतापराव आत्ताच अभिनंदन करून टाकू का? असा प्रश्नही विचारला. दुसरीकडे तीनदा आमदार,मंत्री व तीनदा खासदार असूनही खासदार जाधव किती नम्र आहे आणि मतदार, कार्यकर्ते यांचा किती आदर करतात हे या सभेत दिसून आले.आपले भाषण झाल्यावर त्यांनी व्यासपीठावरुन साष्टांग नमस्कार करून विजयाचा आशीर्वाद घेतला.