महाविकास आघाडीत बंडखोरी! काँगेसच्या ज्ञानेश्वर पाटलांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; खामगाव विधानसभा निवडणुकीत पडले होते;म्हणाले ,मैत्रीपूर्ण लढत...
Updated: Apr 4, 2024, 13:42 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एकीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असतानाच आता त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वर पाटील यांनी बंडखोरी करीत आज बुलडाणा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ज्ञानेश्वर पाटील खामगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते, या निवडणुकीत त्यांनी ७३ हजार ७८९ मते मिळवली होती.
Advt. 👆
ज्ञानेश्वर पाटील यांचे खामगाव, शेगाव तालुक्यात चांगले प्रस्थ आहे. सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून बेदखल केल्याचा राग ज्ञानेश्वर पाटलांनी काढला असावा अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलतांना ज्ञानेश्वर पाटलांनी मैत्रीपूर्ण लढतीचा सुर आवळला. राज्यात काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू आहे, त्यासंबंधात ८ एप्रिल पर्यंत निर्णय होऊ शकतो, त्यामुळे अर्ज दाखल केल्याचे ज्ञानेश्वर पाटील म्हणाले.