शेगावात आज रविकांत तुपकरांची रॅली व निर्धार सभा! सिंदखेडरजातून केला होता प्रचाराचा शुभारंभ, आज संतनगरी शेगावातून समरोप..
रविकांत तुपकर यांना जिल्हाभरात शहरी व ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सर्वच समाजघटकांचे त्यांना समर्थन आणि आशिर्वाद मिळत आहेत. बुलडाणा, सिंदखेडराजा, देऊळगावराजा, मेहकर, खामगाव, जळगाव जामोद, चिखली या मोठ्या शहरांसह दुसरबीड, बीबी, धाड, मोताळा, धामणगाव बढे अशा लहान शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागातील सर्व गावांमध्ये, अगदी वाड्या वस्त्यांमध्ये देखील तुपकरांची रॅली आणि सभा विक्रमी ठरल्या आहेत. आता प्रचाराच्या शेवटच्या दिवशी संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन 'विजयी भव'चा आशिर्वाद घेऊन जनसामान्यांच्या मनातील विजयाचा निर्धार पक्का करण्यासाठी शेगावात आज, बुधवारी २४ एप्रिल रोजी प्रचार रॅली सभा होणार आहे. सकाळी ११ वाजता गांधी चौकातून प्रचार रॅलीला सुरुवात होणार आहे तर जगदंबा चौक, नवीन कॉटन मार्केटच्या जवळ माऊली स्कुलच्या समोरील खुल्या मैदानात सभा होणार आहे. या सभेत रविकांत तुपकर थेट संवाद साधणार असून त्यांच्या मनातील विकासाचे व्हिजन ते मांडणार आहेत. जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि विजयाचा निर्धार करण्यासाठी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Advt