रविकांत तुपकरांचा राजकीय एल्गार! शक्तिप्रदर्शनानंतर अर्ज दाखल; म्हणाले, रुम्हण घेऊन दिल्लीत जाणार! आजच्या रेकॉर्डब्रेक गर्दीने खासदारकीचा मार्ग मोकळा झाला म्हणाले..

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जाहीर सभेतील आक्रमक अन भावनिक भाषणे , हलगी ,बैलबंडीसह बुलडाण्यात दाखल झालेले हजारोंच्या संख्येत दाखल झालेले युवक महिला अन शेतकरी या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचे नामांकन म्हणजे स्वबळावर केलेले शक्तिप्रदर्शन ठरले! या सर्वांच्या साक्षीने तुपकर यांनी २२ वर्षांच्या काळात पहिल्यांदाच राजकीय एल्गार पुकारलाय...
 स्थानिय जिजामाता व्यापार संकुल नजीकच्या मैदानात जाहीर सभा पार पडली. यावेळी तुपकरांनी धुवांधार भाषण करीत उपस्थित कार्यकर्त्यांत जोश भरला. आपल्या भाषणातून त्यांनी केवळ आणि केवळ खासदार जाधव यांनाच लक्ष्य करीत बुलढाणा मतदारसंघातील लढत महायुतीविरुद्ध असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले. यानंतर संगम चौक, जयस्तंभ, बाजारपेठ, कारंजा चौक मार्गे रॅली काढण्यात आली. यानंतर तुपकरांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे आपला अर्ज दाखल केला.
आजच्या गर्दीने खासदारकीचा मार्ग मोकळा केला! २२ वर्षे तुम्हाला सांभाळलं, आता तुम्ही मला सांभाळा; शेतकऱ्यांशी बोलताना भावनिक; मात्र जाधवावर बोलताना रोखठोक  यापूर्वी उमेदवारी अर्ज भरताना शेतकरी नेते रविकांत तुपकर या नेत्याची दोन रूपे पाहायला मिळाली. हजारोंच्या संख्येने उपस्थित शेतकरी, युवक, माता भगिनी यांच्या बद्धल बोलतांना ते अतिशय भावनिक भाषेत बोलले.मात्र खासदार जाधव यांच्यावर बोलताना ते रोखठोक, आक्रमक बोलले.या दोन्ही भाषेतील मनोगताला उपस्थितानी भरभरून टाळ्या देत दाद दिली.
  भाषणाची सुरुवात करताना तुपकर म्हणाले की, मी तुमच्यासमोर नतमस्तक होतो तुमचं दर्शन घेतो या रेकॉर्डब्रेक गर्दीने माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या खासदारकीचा मार्ग मोकळा केला. मला जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना सांगायचं की ही भाड्याने आणलेली माणसे नाहीत, ही स्वतःच्या खर्चाने पदरमोड करून इथे सभेला आल्याचे तुपकर म्हणाले. २२ वर्षाच्या संघर्षात, तुमचे उपकार जीवात जीव असेपर्यंत विसरू शकणार नाही.अर्ज भरायला येऊ नये म्हणून विरोधकांनी दबाव टाकला पण शेतकरी दबावाला भिक घालत नाही. आजही त्यांनी भीक घातली नाही, माझी ताकत, इस्टेट, बळ, सर्वस्व तुम्ही आहात. 
एक ना एक दिवस राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद संपणार आहे, असे सांगून त्यांनी जाधवांचा परखड भाषेत समाचार घेतला. मागील १५ वर्षात त्यांनी काय विकास केला याचे उत्तर त्यांच्याकडेही नाही, जिल्हा भकास करून टाकलं हीच त्यांची उपलब्धी आहे. मेहकर वाल्यांनी अफवा पसरवल्या की, मी अर्ज माघार घेणार म्हणून.मेहकर मध्ये त्यानी अफवांचे पोते भरून ठेवले आहे, मेहकरवाले मुद्दाम करतात. त्यांना यावेळी जनता, शेतकरी पराभवाची धूळ चारणार ही काळ्या दगडावरची रेष आहे असे तुपकर म्हणाले.