रविकांत तुपकरांच्या निर्धार यात्रेला जळगाव जामोद तालुक्यात मिळतोय नागरिकांचा भरभक्कम पाठिंबा; रविकांत तुपकर म्हणाले,जिल्ह्याची मागास ओळख पुसण्यासाठी परिवर्तन गरजेचे...

 
Hdhdh
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :- रविकांत तुपकरांची २२ फेब्रुवारी पासून चालू झालेली निर्धार परिवर्तन यात्रा दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी म्हणजेच २३ व २४ फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद तालुक्यात दाखल झाली. तालुक्यातील खांडवी, अकोला खु., गाडेगाव खु., गोळेगाव (नवे), टाकळी पारस्कर, कुरणगाड, भेंडवळ, चावरा, इलोरा, मडाखेड, वडशिंगी, खेर्डा बु., झाडेगाव, गोळेगाव (हुरसाळ), मानेगाव, हिंगणा मानकर (जुने), दादुलगाव (नवे), गौलखेड, आडोळ बु., मांडवा, पळशी वैद्य, पिंपळगाव काळे, जामोद गावांचा दौरा करत तुपकरांनी बैठका-कॉर्नर सभेच्या माध्यमातून गावकऱ्यांशी संवाद साधला तर खेर्डा बु. व जामोद येथे झालेल्या सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावागावात नागरिकांनी या यात्रेचे जोरदार स्वागत केले. दरम्यान गावकऱ्यांशी संवाद साधतांना तुपकर म्हणाले की, बुलढाणा जिल्ह्याची आत्महत्याग्रस्त व मागास जिल्हा म्हणून ओळख पुसायची आहे, त्यासाठी मला तुमच्या साथीची गरज आहे, येणाऱ्या लोकसभेत परिवर्तन घडावा, जिल्ह्याला विकासाचे मॉडेल केल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
 खामगाव तालुक्यातील मांडका येथे प.पु.लक्ष्मणगिरी महाराजांचे दर्शन घेवून तुपकरांच्या निर्धार परिवर्तन यात्रेला २२ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली. २३ व २४ रोजी ही यात्रा जळगाव जामोद तालुक्यात होती. या यात्रेला नागरिकांचा भरभक्कम पाठिंबा मिळतांना दिसला. शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण व शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ही निर्धार यात्रा असून या यात्रेच्या माध्यमातून जिल्हा पिंजून काढणार आहे. या यात्रेला नागरिकांचा मिळणारा जोरदार पाठिंबा हा नागरिकांचा आपल्यावरील विश्वास आहे. बुलढाणा जिल्ह्याची राज्यपातळीवर मागास व आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळख आहे. ही ओळख आपल्याला पुसायची आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात परिवर्तनाची आग आहे. येणाऱ्या लोकसभेत तुम्ही फक्त मला साथ द्या, जिल्ह्याला विकासाचे मॉडेल करून दाखवू, असा निर्धार रविकांत तुपकरांनी बोलतांना व्यक्त केला.
        यावेळी युवा आंदोलक अक्षय पाटील-भालतडक, श्याम अवथळे, अनंता मानकर, नितीन पाचपोर, दिपक पाटील-अढाव, समाधान धुरडे, समाधान दामधर, वैभव वानखेडे, अश्फाक देशमुख, वैभव जाने, सुनील अस्वार, अस्लम शेख, आकाश आटोळे, प्रशांत पारस्कार, शिवदास खिरोडकार, ईश्वर अंबलकार, अनिलसिंग राजपूत, सोपान पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.