रविकांत तुपकरांची निर्धार परिवर्तन सभा आज सायंकाळी उत्रादा येथे! तुपकरांच्या निर्धार यात्रेला चिखली तालुक्यात दमदार प्रतिसाद...

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केलेल्या शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना सर्वच स्थरातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. तुपकर यांनी काढलेल्या निर्धार परिवर्तन यात्रेचे जिल्हाभरात ठिकठिकाणी दमदार स्वागत होत असून आज यात्रेच्या दहाव्या दिवशी चिखली तालुक्यातील विविध ठिकाणी अलोट गर्दी जमली. आज सायंकाळी उत्रादा येथे तुपकर निर्धार परिवर्तन सभेला संबोधित करणार आहेत.
Gd
                                    Add. 👆
काहीही झाले तरी यंदा लोकसभा निवडणूक लढवायचीच अशी घोषणा तुपकर यांनी केलेली आहे. त्यादृष्टीने तुपकर सध्या जिल्हा पिंजून काढत आहेत. २२ फेब्रुवारीपासून तुपकर यांनी निर्धार परिवर्तन यात्रा सुरू केली आहे. या यात्रेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. सध्या ही यात्रा चिखली तालुक्यात असून आज, २ मार्चला नवव्या दिवशी माळशेंबा, साकेगाव, खोर, भोकर, पळसखेड दौलत, गोद्री, चांधई, मुंगसरी, खैरव या गावांत यात्रेचे दमदार स्वागत करण्यात आले. आज सायंकाळी उत्रादा येथे होणाऱ्या जाहीर सभेला रविकांत तुपकर संबोधित करणार आहेत. या सभेत तुपकर विरोधकांचा खरपूस भाषेत समाचार घेण्याची शक्यता आहे.