रविकांत तुपकरांचे आता "चलो मुंबई"! मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला दिला ७ दिवसांचा अल्टिमेटम!

अन्यथा २९ नोव्हेंबरला घेणार मंत्रालयाचा ताबा; बुलडाण्यात एल्गार महामोर्चा ठरला रेकॉर्डब्रेक! रविकांत तुपकरांनी राजकारण्यांना फैलावर घेतले; म्हणाले, राजकारणातील रोह्यांचा बंदोबस्त गरजेचा, लई निब्बर झालेत; तुपकरांचा निशाणा कुणावर?
 
Hdbd
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय मी लढाईचे मैदान सोडणार नाही . आता लढाई आरपारची आहे. लढून मरा किंवा उड्या घेऊन मरा हे दोनच पर्याय आपल्याकडे आहे.आता लढून मारण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी माझी शहीद व्हायची तयारी आहे. सोयाबीन कापसाच्या भाववाढीसह, शेतकऱ्यांची कर्जमाफी, महिला बचत गटांचे कर्जमाफ, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी १० हजाराची मदत व सरसकट दुष्काळ जाहीर करणे यासह इतर मागण्यांवर सरकारने ७ दिवसांत निर्णय घ्यावा अन्यथा २८ नोव्हेंबरला हजारो शेतकरी मुंबईला रवाना होतील, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी मुंबईत येतील,२९ नोव्हेंबरला आम्हीमंत्रालयाचा ताबा घेऊ असा खणखणीत इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला. बुलडाण्यात आज आयोजित एल्गार महामोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते. ५ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या एल्गार रथयात्रेची सांगता आज बुलडाण्यात एल्गार महामोर्चाने झाली, जिल्हाभरासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शेतकऱ्यांची, माता भगिनींची यावेळी उपस्थिती होती.
Rt
 दुपारी दीडच्या सुमारास जिजामाता प्रेक्षागार मैदानातून एल्गार महामोर्चाला सुरुवात झाली. त्याआधी ह.भ. प पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे जाहीर कीर्तन झाले. मोर्चा जयस्तंभ चौक, बाजार गल्ली, कारंजा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले.
राजकारणातील रोह्यांचा बंदोबस्त करा?
   
 शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा प्रचंड त्रास आहे. रोह्यांनी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. सरकारने शेतकऱ्यांची यापासून सुटका करावी, शेतीला पक्के कंपाऊंड सरकारने द्यावे, २५ टक्के वाटा शेतकरी देतील असे तुपकर म्हणाले. सध्या राजकारणात सुद्धा काही रोह्यांनी हैदोस घातला आहे, या रोह्यांचा पहिले तुम्ही बंदोबस्त करा, लई निब्बर झालेत असे तुपकर 
सभास्थळी उपस्थित शेतकऱ्यांना उद्देशून म्हणाले.. तुपकरांच्या या विधानाचा निशाणा कुणावर यावर सभा संपल्यानंतर चांगलीच चर्चा रंगलेली होती..
मोर्चाला जाऊ नका म्हणून शेतकऱ्यांवर दबाव..!
हा एल्गार मोर्चा यशस्वी होऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मोताळा, बुलडाणा तालुक्यातील गावागावात गावकऱ्यांना फोन केल्या गेले, मोर्चात जाऊ नका, तुपकरांच्या यात्रेचे स्वागत करू नका असे सांगितल्या गेले. मेहकर तालुक्यातील गावोगावच्या सरपंचांना फोन करून एल्गार मोर्चात सहभागी होऊ नका म्हणून सांगितले गेले असा गौप्यस्फोट यावेळी तुपकरांनी केला. तुम्ही जेवढे दाबण्याचा प्रयत्न कराल तेवढे आम्ही उसळणार, आमच्या नादाला लागू नका असे तुपकर विरोधकांना उद्देशून म्हणाले.